यूनायटेड हेल्थ समूहाच्या सीईओंचा अचानक राजीनामा
समभाग 17 टक्क्यांनी घसरणीत
नवी दिल्ली :
यूनायटेड हेल्थसमूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँड्यू विट्टी यांनी अचानक आपला राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर बाजारातील समूहाचे समभाग मात्र मोठ्या प्रमाणात पडझडीत राहिल्याचे दिसून आले. अमेरिकेतील सर्वात मोठी आरोग्य विमा कंपनीने 13 मे 2025 रोजी घोषणा केली की, कंपनीचे सीईओ अँड्यू विट्टी यांनी वैयक्तिक कारण देत आपला राजीनामा दिला आहे. वरील बातमी वेगाने पसरताच गुंतवणूकदार आणि आरोग्य उद्योगाला मोठा झटका बसला आहे. यासह कंपनीकडून 2025 साठी सादर करण्यात आलेल्या आर्थिक अंदाजही रद्द करण्यात आले आहेत.
2021 रोजी सीईओपदी रुजू
यूनायटेडहेल्थ समूहाचे सीईओ अँड्यू विट्टी हे 2021 मध्ये सीईओपदी विराजमान झाले होते. मात्र अचानकपणे त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आरोग्य क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे. सध्या त्यांच्या जागी स्टीफन जे. हेम्सले हे सीईओ पदाची धुरा सांभाळणार आहेत.