For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युनायटेड गोवन्स, निपाणी एफसी विजयी

09:52 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
युनायटेड गोवन्स  निपाणी एफसी विजयी
Advertisement

लोकमान्य चषक फुटबॉल स्पर्धा

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक बीडीएफए वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामान्यातून युनायटेड गोवन्सने ब्रदर्स एफसीचा तर निपाणी एफसीने स्वस्तिक एफसीचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. स्पोटिंग फ्लानेट मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात युनायटेड गोवन्सने ब्रदर्स एफसीचा 4-3 असा पराभव केला. या सामन्यात 7 व्या मिनिटाला ब्रदर्स एफसीच्या इक्लास सौदागरच्या पासवर जयेश सांबरेकरने पहिला गोल केला. 10 व्या मिनिटाला यश येळ्ळूरकरच्या पासवर इक्लास सौदागरने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 31 व्या मिनिटाला शाहीद मुजावरच्या पासवर नावल शेखसुरबने पहिला गोल करून 1-2 ची आघाडी पहिल्या सत्रात कमी केली. दुसऱ्या सत्रात 38 व 45 व्या मिनिटाना युनायटेड गोवन्सच्या नावेलच्या पासवर शाहीद मुजावरने सलग 2 गोल करून 3-2 ची आघाडी मिळविली.

50 व्या मिनिटाला शाहीदच्या पासवर मयूर पालेकरने चौथा गोल करून 4-2 ची आघाडी मिळविली. 54 व्या मिनिटाला ब्रदर्सच्या जयेश सांबरेकरच्या पासवर यश येळ्ळूरकरने तिसरा गोल करून 3-4 ची आघाडी कमी केली. दुसऱ्या सामन्यात निपाणी एफसीने स्वस्तिक एफसीचा 4-2 गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात 15 व्या मिनिटाला स्वस्तिकच्या अमय जाधवच्या पासवर मिलिंद पाटीलने पहिला गोल केला. 18 व्या मिनिटाला निपाणीच्या ओमकार शिंदेच्या पासवर प्रशांत आजरेकरने गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. 19 व्या मिनिटाला मिलिंदच्या पासवर अमय जाधवने दुसरा गोल केला. 24 व्या मिनिटाला निपाणीच्या करण मानेच्या पासवर ओमकार शिंदेने दुसरा गोल करून 2-2 अशी बरोबरी साधली. दुसऱ्या सत्रात 38 व्या मिनिटाला प्रशांतच्या पासवर ओमकार शिंदेने तिसरा गोल केला. तर 49 व्या मिनिटाला ओमकारच्या पासवर करण मानेने चौथा करून करून 4-2 आघाडी मिळवून दिली.

Advertisement

बुधवारचे सामने

  • गोवन्स एफसी वि. शिवाजी कॉलनी दु. 3 वा.
  • टिळकवाडी एफए वि. सिटी स्पोर्ट्स सायं. 4.30 वा.
Advertisement
Tags :

.