For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युनायटेड गोवन्स, निपाणी, ब्रदर्स, इलेव्हन स्टार उपांत्य फेरीत

10:06 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
युनायटेड गोवन्स  निपाणी  ब्रदर्स  इलेव्हन स्टार उपांत्य फेरीत
Advertisement

लोकमान्य चषक फुटबॉल स्पर्धा

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत गुरूवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात युनाटेड गोवन्सने साईराजचा, निपाणीने कॉसमॅक्सचा, ब्रदर्सने दर्शनचा तर इलेव्हन स्टारने फास्ट फॉरवर्डचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. स्पोर्टींग प्लॅनेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात युनायटेड गोवन्सने साईराजचा टायब्रेकरमध्ये 5-4 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात निपाणीने कॉसमॅक्सचा 5-3 अशा टायब्रेकरमध्ये पराभव केला. सामन्यात 18 व्या मिनिटाला कॉसमॅक्सच्या मुझमिलने गोल केला. तर दुसऱ्या सत्रात निपाणीच्या करण मानेने गोल करुन 1-1 अशी बरोबरी केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघाचा गोलफलक समान राहिल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये निपाणीने 5-3 अशा गोल फरकाने पराभव केला. निपाणीतर्फे करण माने, ऋषिकेश, ओंकार व ज्ञानेश्वर यांनी गोल केले. तर कॉसमॅक्सतर्फे अमित व माविया उस्ताद यांनी गोल केले.

तिसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ब्रदर्सने दर्शन युनायटेडचा 1-0 असा निसटता पराभव केला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने गोल फलक कोराच राहिला. 34 व्या मिनिटाला ब्रदर्सच्या इक्लास अहमद अझाझने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दर्शनने गोल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले. चौथ्या उपांत्य फेरीच्या सामन्यता इलेव्हन स्टारने फास्ट फॉरवर्डचा सडन डेथमध्ये 6-5 अशा गोल फरकाने पराभव केला. निर्धारित वेळेत दोन्हीही संघांना अपयश आल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर करुन टायब्रेकरमध्ये दोन्ही संघांनी 5-5 अशी बरोबरी केली. इलेव्हन स्टारतर्फे तेजस व विकी गॉटम, अनास सीबी, रहिद अंजुम व ओयाज यांनी गोल केले. तर फास्ट फॉरवर्डतर्फे नितीन, नदिम, हिदायत, वासिम यांनी गोल केले. त्यानंतर पंचांनी सडन डेथ नियमाचा वापर केला. त्यात इलेव्हन स्टारने 6-5 असा पराभव केला. इलेव्हन स्टारतर्फे  रितीक रवीने गोल केला. तर फास्ट फॉरवर्डच्या हर्षलने मारलेला फटका विकी गॉटमने उत्कृष्ट अडवून संघाला उपांत्य फेरीत पोहोचविण्यात सिंहाचा वाटा उचलला.

Advertisement

शुक्रवारचे उपांत्य फेरीचे सामने

ब्रदर्स वि. युनायटेड गोवन्स, इलेव्हन स्टार वि. निपाणी यांच्यात खेळविण्यात येणार आहेत.

Advertisement
Tags :

.