For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युनायटेड गोवन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा उद्यापासून

10:08 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
युनायटेड गोवन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा उद्यापासून
Advertisement

चषकाचे अनावरण, 16 संघांचा सहभाग

Advertisement

बेळगाव : युनायटेड गोवन्स स्पोर्ट्स क्लब आयोजित युनायटेड गोवन्स चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा गुरुवार दि. 20 पासून सुभाषचंद्र लेले मैदानावरती प्रारंभ होणार असून या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. सदर स्पर्धेतील स्थानिक 16 शालेय संघाने भाग घेतला असून त्यामध्ये गतविजेता ज्ञानप्रबोधन, केएलई इंटरनॅशनल, शेख सेंट्रल, संतमीरा, भरतेश, एमव्हीएम, सेंट झेवियर्स, मदनी, एम. व्ही हेरवाडकर, केएलएस इंग्लिश मॅडम स्कूल, ज्ञानमंदीर, केंद्रीय विद्यालय-2, सेंटपॉल्स, मुक्तांगण व ज्योती सेंट्रल स्कूल या संघाचा सहभाग आहे. या स्पर्धेच्या चषकाचे आज अनावरण करण्यात आले.

यावेळी युनायटेड गोवन्स रिक्रेशन क्लबचे अध्यक्ष शांतनु पुसाळकर, ईग्नेशेस मर्क्सनस, प्रशांत हिरेमठ, विल्यीयम मेनेजीस, सुनील कल्याणपूर, डॉ. जॉर्ज रॉड्रीग्स यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धा गुरूवारपासून सुरू होत असून उद्घाटनाचा सामना एमव्हीएम वि. सेंट झेवियर्स यांच्यात सकाळी 8 वा. मदनी वि. एम. व्ही हेरवाडकर यांच्यात सकाळी 9 वा. केएलई इंटरनॅशनल वि. शेख सेंट्रल स्कूल सकाळी 11 वा., केंद्रीय विद्यालय -2 वि. सेंटपॉल्स यांच्यात दुपारी 12 वा. संतमीरा वि. भरतेश यांच्यात दु 1. वा. तर केएलएस इंग्लिश मॅडम वि. ज्ञानमंदीर यांच्यात दु 2 वा. सामना खेळविण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.