For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशियातील अनोखे थीम पार्क

06:25 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
रशियातील अनोखे थीम पार्क
Advertisement

टँक-ग्रेनेड लाँचरने खेळतात लहान मुले

Advertisement

रशिया हा अमेरिकेनंतरचा शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा विक्रेता आहे. रशियाकडून निर्मित टँक-ग्रेनेड लाँचर, लढाऊ विमाने भारतासमवेत जगातील अनेक देशांकडून वापरली जातात. रशियातील लोकांना नेहमी युद्धासाठी सज्ज राहण्यास सांगितले जाते.  शालेय मुलांना देखील स्वरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जात असते. सर्वसाधारणपणे कुठल्याही देशातील उद्यानात मनोरंजनाचे ठिकाण असते, परंतु रशियाने एक अनोखे थीम पार्क निर्माण केले असून तेथे लहान मुले टँक-ग्रेनेड लाँचर आणि शस्त्रास्त्रांशी खेळत असतात. या थीमपार्कमध्ये नजर टाकल्यास तुम्हाला ते युद्धाचे प्रशिक्षण घेत आहेत असेच वाटू लागते.

रशियातील या पार्कला पॅट्रियट हे नाव देण्यात आले आहे. परंतु येथील शस्त्रास्त्रs पाहता याला रशियाचे मिलिट्री डिस्नेलँड देखील म्हटले जाते. येथे लहान मुले रोलरकोस्टरच्या सवारीऐवजी लढाऊ विमाने आणि अवजड शस्त्रास्त्रांवर चढू शकतात.

Advertisement

4 हजार हेक्टरमध्ये फैलाव

पॅट्रियट पार्क 4 हजार हेक्टरमध्ये फैलावलेले आहे. यातील बहुतांश ठिकाणी सैन्यवाहने, आंतरखंडीय क्षेपणास्त्रs ठेवण्यात आली आहेत. येथे 268 हून अधिक सोव्हियत कालीन विमाने असून यात हेलिकॉप्टर्स देखील सामील ओत. अनेक देशांचे सुमारे 350 रणगाडे आणि चिलखती वाहने ठेवण्यात आली आहेत. येथे कुणीही जाणून युद्धाच्या रोमांचाचा अनुभव घेऊ शकतो. या पार्कला दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हियत सैन्याच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी 2015 मध्ये सुरू करण्यात आले होते.

सैन्याच्या कँटिनची सुविधा

आठवड्यातील 6 दिवस सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे पार्क खुले राहते. 8 ते 13 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हे पार्क मोफत आहे. येथे काही प्रमाणात सैन्य प्रशिक्षणही दिले जाते. यासाठी प्रशिक्षक उपलब्ध असतो. शूटिंग रेंज असून तेथे तुम्ही निशाणाही साधू शकता. भूक लागल्यास सैन्याच्या कँटिनमधून तुम्ही खाद्यपदार्थ मिळवू शकतात. काही भेटवस्तूही खरेदी करता येतो. यात सैन्याचे टीशर्ट, राष्ट्रपती पुतीन यांचे छायाचित्रे असलेले आयफोन कव्हर, सैन्याचे ब्रँडेड पाणी इत्यादीचा यात समावेश आहे

Advertisement
Tags :

.