चक्क दगडाला निवेदन देऊन केलं अनोख निषेध आंदोलन
कोल्हापुरात महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक
चक्क दगडाला निवेदन देऊन केलं अनोख निषेधात्मक आंदोलन
कोल्हापूर
कोल्हापुरात महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक झाली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गोंधळ घातला आहे. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती चढण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. शासनाकडून बेघर यादीतील लोकांना इंदिरा आवास योजनेमधून व मागासवर्गीय समाजातील बेगर लोकांना रमाई आवास योजने मधून घरकुले मंजूर होतात. मात्र वित्तीय संस्था या घरकुल धारकांच्याकडून बेकायदेशीर कर्ज वसूल करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात दगडाला निवेदन देऊन अनोखा निषेधात्मक आंदोलन केले.