माजगावच्या कलाशिक्षकाची जिल्हाधिकाऱ्यांना अनोखी भेट
स्वतःचे हुबेहूब पेन्सिल स्केच पाहून जिल्हाधिकारी बेहद्द खुश !
ओटवणे | प्रतिनिधी
माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक सिद्धेश कानसे यांनी स्वतः काढलेले जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे पेन्सिल पोर्ट्रेट स्केच देऊन त्यांना अनोखी भेट दिली. सिद्धेश कानसे या कला शिक्षकाने आपली काढलेली हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच पाहून जिल्हाधिकारी अनिल पाटील देहात बेहद्द खुश झाले. त्यांनी सिद्धेश कानसे यांच्या या पेन्सिल पोर्ट्रेट स्केच कलेचे कौतुक करीत त्यांच्या या कलेला शुभेच्छा दिल्या. माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट क्लासरूमच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अनिल पाटील आले असता त्यांना त्यांचे पेन्सिल पोर्ट्रेट स्केच देण्यात आले. आपल्या हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केचचा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना सुखद धक्का बसला. यावेळी त्यांनी प्रशालेचे कलाशिक्षक सिद्धेश सुधाकर कानसे यांनी रेखाटलेल्या आपल्या व्यक्तीचित्राचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले की, या व्यक्तीचित्र रेखाटनाबद्दल एका शब्दात सांगायचं तर अप्रतिम. खूपच सुंदर कलाकृती! सिद्धेश कानसे, तुमची कला उत्तरोत्तर बहरत जावो. अशा शब्दात सिद्धेश कानसे यांचे कौतुक केले.