महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माळी गल्ली मंडळाची अनोखी गणेशमूर्ती

11:13 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2 लाख चिंचोक्यांपासून साकारला पर्यावरणपूरक गणेश

Advertisement

बेळगाव : दरवर्षी सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करणाऱ्या माळी गल्ली, दर्गा रोड येथील मंडळाने यावर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारली आहे. तब्बल 2 लाख 2 हजार 111 चिंचोक्यांच्या साहाय्याने गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे. ही इकोफ्रेंडली गणेशमूर्ती पाहण्यासाठी गर्दी होत आहे. बेळगावमध्ये नाविन्यपूर्ण गणेशमूर्ती तयार केल्या जातात. कागदी लगद्यापासून गणेशमूर्ती तयार करण्यासोबतच यापूर्वी विविध माध्यमातून गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. कडधान्य, गवत, एलईडी लाईट, काचेच्या गोट्या यासह इतर साहित्याचा वापर करून गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. यावर्षी माळी गल्ली मंडळाने चिंचोक्यांचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केली आहे. 8 फूट उंच गणेशमूर्ती तयार करून त्यावर चिंचोके बसविण्यात आले आहेत. मूर्तिकार सुनील आनंदाचे यांनी ही मूर्ती घडविली आहे.

Advertisement

दरवर्षी अनोखे देखावे

मागील वर्षी या मंडळाने नशेच्या आहारी गेल्यानंतर कोणते दुष्परिणाम भोगावे लागतात, याची माहिती देखाव्यातून देण्याचा प्रयत्न केला होता. गुटखा, दारू, सिगारेट यांच्या सेवनाने तरुणाई कशी व्यसनांच्या आहारी जात आहे, याचा देखावा त्यांनी साकारला होता. यावर्षी झाडे लावा, झाडे जगवा या संकल्पनेवर आधारित देखावा सादर केला जाणार आहे. गणरायाचे वाहन मूषक कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करतो, हे काल्पनिकरीत्या देखाव्याद्वारे दाखविण्याचा प्रयत्न मंडळाने यावर्षी केला आहे.

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीमागील संकल्पना 

सामाजिक संदेश देणारे देखावे केल्यानंतर यावर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर न करता रद्दी पेपर व गवताच्या साहाय्याने मूर्ती तयार करून त्यावर 2 लाख चिंचोके चिकटविण्यात आले आहेत. मूर्ती विसर्जन केल्यानंतर ज्या ठिकाणी हे निर्माल्य टाकले जाईल, त्या ठिकाणी चिंचेची झाडे उगवतील, अशी यामागील संकल्पना आहे.

- मेघन लंगरकांडे (अध्यक्ष, माळी गल्ली गणेशोत्सव मंडळ)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article