आचऱ्यात अनोख्या भक्तीगीत नृत्यदिग्दर्शन स्पर्धेचे आयोजन
12:47 PM Nov 02, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
आचरा | प्रतिनिधी
Advertisement
आचरा येथील इनामदार रामेश्वर मंदिर येथे कार्तिकोत्सवा निमित्त मंगळवारी 4 नव्हेंबर रोजी रात्री पालखी सोहळ्यानंतर अनोख्या अशा भक्तिगीतांच्या रेकॉर्डवर आधारित भक्तीगीत नृत्यदिग्दर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी नृत्य दिग्दर्शन प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकासाठी अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार, एक हजार व स्मृतीचिन्ह अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.या स्पर्धेत सहभागी संघाना भक्तिगीत समुह नृत्ये सादर करायची आहेत केलेल्या नृत्यावर नृत्यदिग्दर्शकाचे परीक्षण होणार आहे. या स्पर्धेच्या बक्षिसाचे मानकरी हे नृत्यदिग्दर्शक असणार आहेत. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी संपर्क विजय कदम 9421037712 करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Advertisement
Advertisement
Next Article