दुचाकी आणि स्कूटरची अनोखी कॉन्सेप्ट मॉडेल्स सादर
जगातील पहिली सीएनजी स्कूटरही दाखल : ग्लोबल एक्स्पो 2025 मधील अनोख्या फिचर्ससोबत मॉडेल्सचे सादरीकरण
नवी दिल्ली :
जगभरात दिग्गज व प्रसिद्ध असणाऱ्या वाहन कंपन्यांपैकी टीव्हीएस, बीएमडब्ल्यू आणि यामाहा या सारख्या अनेक मोठ्या ब्रँड्सनी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये त्यांच्या नव्या फिचर्ससोबत आपले कॉन्सेप्ट मॉडेल सादर केले आहेत. यामधील काही आकर्षक व विशेष मॉडेल्सबाबतची माहिती पुढीलप्रमाणे...
एक्स्पो 2025 मध्ये सादर केलेल्या बाईक आणि स्कूटरची कॉन्सेप्ट मॉडेल्स..
- टीव्हीएस ज्युपिटर सीएनजी
टीव्हीएस ज्युपिटर सीएनजी कॉन्सेप्ट ही जगातील पहिली सीएनजी-चालित स्कूटर आहे. ही कंपनीच्या पेट्रोल स्कूटर ज्युपिटर 125 वर आधारित आहे आणि त्यात सीटखाली 1.4 किलो सीएनजी टँक आहे, तसेच 2-लिटर पेट्रोल टँक आहे. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर पूर्ण टँकवर (सीएनजी व पेट्रोल) 226 किमी आणि सीएनजी मोडमध्ये 84 किमी प्रति किलो मायलेज देईल.
- हिरो विडा अॅक्रो
हीरो मोटोकॉर्पने विडा अॅक्रोचे प्रदर्शन केले आहे. ही मुलांसाठी एक इलेक्ट्रिक ऑफ-रोड बाईक आहे. विडा अॅक्रो सामान्य डर्ट बाईकसारखी दिसते. विडा अॅक्रो विशेषत: ट्रॅकवर धावण्यासाठी डिझाइन केलेली आहे. त्यात हब मोटर आहे, जी ती 25 किमी प्रतितासच्या टॉप स्पीडवर नेऊ शकते. थ्रॉटल रिस्पॉन्स बदलण्यासाठी तीन रायडिंग मोड दिले आहेत.
- यामाहा वाय/एआय मोटरसायकल
यामाहाची वाय/एआय संकल्पना मोटरसायकल ही कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि भविष्यकालीन डिझाइनचे मिश्रण आहे. त्याची रचना वायझेडआर एम-1 द्वारे प्रेरित आहे आणि ती एक एआय-चालित भविष्यातील बाईक आहे. ही बाईक 2024 च्या आय सायन्स-फिक्शन वेब सिरीज ‘अॅनिम टोकियो ओव्हरराइड’ मध्ये देखील दाखवण्यात आली आहे.
- टीव्हीएस व्हिजन आयक्यूब
टीव्हीएस व्हिजन आयक्यूब कॉन्सेप्ट ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी 3.4 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीने सुसज्ज आहे आणि त्याची वास्तविक रेंज 150 किमी आहे. यात दोन रिमूव्हेबल रेंज बूस्टर आहेत, जे तिची रेंज 40-50 किमीने वाढवतात. भविष्यकालीन डिझाइनमध्ये कॉपर पेंट स्कीम, पारदर्शक हेड-अप डिस्प्ले, फ्लोटिंग बटण, ऑटोमॅटिक हाईट-अॅडजस्टेबल सीट आहेत.
- बीएमडब्ल्यू एफ 450 जीएस
बीएमडब्ल्यू एफ 450 जीएस ही एक साहसी टूरिंग कॉन्सेप्ट बाईक आहे जी मोठ्या बीएमडब्ल्यू आर 1300 जीएसपासून प्रेरित आहे. कामगिरीसाठी त्यात 450 सीसी ट्विन-सिलेंडर इंजिन आहे, जे 48 एचपी पॉवर जनरेट करते. यात दोन्ही टोकांना लाँग-ट्रेल पूर्णपणे अॅडजस्टेबल सस्पेंशन आणि कॉर्नरिंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी अशी वैशिष्ट्यो आहेत.
6. टीव्हीएस आरटीएस-एक्स
टीव्हीएस आरटीएस-एक्स कॉन्सेप्ट ही एक सुपरमोटो बाईक आहे जी आगामी टीव्हीएस आरटीएक्स 300 अॅडव्हेंचर बाईक सारख्याच चेसिस प्लॅटफॉर्मवर नवीन आरटीएस-एक्स डी 4 299 सीसी इंजिनसह बनवली आहे. हे इंजिन 35 एचपी आणि 28.5 एनएम पॉवर निर्माण करते.
- अँपिअर जिबर
अँपिअरने झायबर कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक मोटरसायकल सादर केली. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक बाईक पूर्ण चार्ज केल्यावर 200 किमीची वास्तविक जगात धावण्याची क्षमता देते. कामगिरीसाठी यात 10 किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे, ज्याचा टॉप स्पीड 100 किमी प्रतितास आहे.