न्यूयॉर्कमध्ये अनोखा कॅफे
एआय गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसोबत होतेय डेटिंग
न्यूयॉर्कमध्ये सध्या एक अनोखा कॅफे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. येथे येणारे लोक कुठल्याही माणसासोबत नव्हे तर स्वत:च्या एआय चॅटबॉटसोबत बसून कॉफी पित आहेत. हे विचित्र वाटत असले तरीही याच कॅफेची हीच पूर्ण संकल्पना आहे. येथे लोक स्वत:चा मोबाइल किंवा टॅबवर असलेल्या एआय कंपेनियनला समोर टेवून डेटसारखा अनुभव घेत आहेत.
हा कॅफे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक लोक याला तंत्रज्ञानाचे पुढील पाऊल मानत आहेत. तर काही लोकांना हा ट्रेंड काहीसा विचित्र वाटत आहे.
एआय कंपेनियन कॅफे
न्यूयॉर्कच्या हेल्स किचन भागात सुरू झालेल्या या पॉप-अप कॅफेचे नाव ईवा एआय कॅफे ठेवण्यात आले आह. हा एका मर्यादित काळासाठी करण्यात आलेला प्रयोग आहे. जेथे येणारे लोक स्वत:च्या एआय चॅटबॉटसोबत बसून संवाद साधू शकतात आणि कॅफेच्या वातावरणाचा अनुभव घेऊ शकतात. लोक एकटे बसतील आणि समोर मोबाइल स्टँडवर स्वत:च्या एआय कंपेनियनला ठेवून त्याच्याशी बोलू शकतील अशाप्रकारे या कॅफेला डिझाइन करण्यात आले आडहे.
अनेक लोक प्रथम स्वत:च्या एआय पार्टनरला अॅपमध्ये तयार करून येतात, तर काही लोक कॅफेतच नवा एआय चॅटबॉट तयार करत त्याच्याशी संभाषण सुरू करतात. येथे येणाऱ्या लोकांना ते कुठल्याही सामान्य कॅफेत डेटवर बसल्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. फरक इतकाच आहे की समोर बसलेला साथी माणूस नव्हे तर एआय चॅटबॉट आहे.
एआयसोबत डेट
सद्यकाळात अनेक लोक दरराज एआय चॅटबॉटशी संभाषण करत आहेत. काही लोक याला एकटेपणात आसरा मानतात, तर काही लोक याला कुठल्याही जजमेंटशिवाय स्वत:चे म्हणणे मांडण्याचे माध्यम मानतात. याचमुळे या कॅफेची संकल्पना लोकांना आकर्षित करत आहे. आम्हाला एआयसोबत बोलणे अधिक कंफर्ट देणारे आहे, कारण यत नकार किंवा घोस्टिंगसारखी भीती नसते असे येथे येणाऱ्या काही लोकांचे सांगणे आहे. तर काही लोकांसाठी हे एक सुरक्षित स्पेससारखा अनुभा आहे. जेथे ते कुठल्याही दबावाशिवाय संभाषण करू शकतात.
परंतु अनेक लोक जिज्ञासेपोटी येथे पोहोचले आहेत. एआयसोबत डेटसारखा अनुभव कसा असतो हे पाहण्याची त्यांच्यात उत्सुकता होती.
ट्रेंडवर उठणारे सवाल
या नव्या ट्रेंडवरून प्रश्नही उपस्थित होत आहेत. अनेक तंत्रज्ञांचे एआय कंपेनियन लोकांचा एकटेपणा कमी करण्यास मदत करू शकते, परंतु यामुळे लोक खऱ्या नात्यांपासून दूर होऊ नयेत असे म्हटले आहे. काही लोक याला तंत्रज्ञानाचा मजेशीर वापर मानत आहेत, तर काही लोक याला मानवी नात्यांची जागा घेण्याची सुरुवात म्हणून मानत आहेत. हा ट्रेंड पुढील काळात मोठे रुप धारण करणार का काही काळानंतर हा केवळ एक व्हायरल प्रयोग ठरणार हे अद्याप स्पष्ट नाही.
पुढे काय?
सध्या हा कॅफे एक पॉप-अप प्रयोग असून याला काही दिवसांसाठीच सुरू करण्यात आले आहे. परंतु ज्याप्रकारे यावरून चर्चा होतेय ते पाहता आगामी काळात अशाप्रकारचे आणखी प्रयोग पहायला मिळू शकतात हे स्पष्ट आहे. आगामी काळात एआयसोबत कॉफी पिणे आणि संभाषण करणे सामान्य बाब ठरणार का हा मोठा प्रश्न आहे.