For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ५ मे रोजी सावंतवाडीत प्रचारसभा

02:56 PM Apr 30, 2024 IST | अनुजा कुडतरकर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ५ मे रोजी सावंतवाडीत प्रचारसभा
Advertisement

राजन तेलींची पत्रकार परिषदेत माहिती

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सावंतवाडीत जाहीर सभेसाठी येणार आहेत. अशी माहिती भाजप सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत आज येथे दिली. तर दिनांक ४ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची नारायण राणेंच्या प्रचारार्थ कणकवली येथे जाहीर सभा होणार आहे . तेली म्हणाले , श्री गडकरी यांच्या जाहीर सभेने सावंतवाडीत महायुतीच्या प्रचाराचा समारोप होणार आहे. श्री तेली पुढे म्हणाले केंद्रीय मंत्री नारायण राणे हे अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येणारच आहेत याची आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 57 योजना सर्वसामान्य गोरगरिबांसाठी आणले आहेत. तो विकासाचा अजेंडा हा आमच्या विजयाचा फॉर्म्युला आ. हे विरोधक काही टीका करो आम्ही विकास कामे घेऊन जात आहोत त्यामुळे जनता आमच्या बाजूने आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. येथील तरुणांना रोजगारासाठी आम्ही सी वर्ल्ड प्रकल्प आणि जैतापूर प्रकल्पाच्या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. पण ,यांना विरोध खासदार विनायक राऊत यांनीच केला . आणि आता ते विकासाच्या नावाने आणि बेरोजगारीच्या नावाने बोंबा मारत आहेत अशी टीका श्री तेली यांनी केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.