For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज बेळगावात

11:23 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज बेळगावात
Advertisement

कार्यक्रम स्थळाची खासदार इरण्णा कडाडींकडून पाहणी

Advertisement

बेळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी रिंगरोड कामाच्या उद्घाटनासह उत्तर कर्नाटकातील विविध विकासकामांना चालना देण्यासाठी दि. 22 रोजी बेळगावला येत आहेत. या पार्श्वभूमीवर नियोजित कार्यक्रमाच्या स्थळाची राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग योजना संचालक भुवनेश्वरकुमार शुक्ला, राज्य महामार्ग प्राधिकारचे अभियंते अजित, अजिंक्य, राज्य महामार्ग प्राधिकारचे साहाय्यक आयुक्त बलराम चव्हाण, बेळगाव उपविभाग अधिकारी बसवणेप्पा कलशट्टी, तहसीलदार भोसगी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.