For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्रीय मंत्री गडकरी डिसेंबरमध्ये गोव्यात

10:39 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
केंद्रीय मंत्री गडकरी डिसेंबरमध्ये गोव्यात
Advertisement

पणजी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे येत्या 22 डिसेंबरपासून तीन दिवसांच्या गोवा भेटीवर येणार असल्याचे वृत्त आहे. ते गोव्यात विश्रांतीसाठी येणार आहेत. त्याच संधीचा लाभ घेऊन ते गोव्यातील विविध राष्ट्रीय स्तरावरच्या प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य काही प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी भरीव मदत ते करणार आहेत. झुवारी नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आले असून त्याचे उद्घाटन 25 डिसेंबरपूर्वी केले जाणार आहे. कदाचित त्या कार्यक्रमालादेखील मंत्री गडकरी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.