For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

राज्यातील 7 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक

06:36 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यातील 7 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

Advertisement

कर्नाटक राज्यातील सात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना, तपास व न्यायवैद्यक विज्ञान (फॉरेन्सिक सायन्स) क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल, 2026 या वर्षासाठी प्रतिष्ठित ‘केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक’ जाहीर करण्यात आला आहे.  तपास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सहा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये बेंगळूरच्या हलसूर गेट रहदारी पोलीस स्थानकाच्या निरीक्षक शोभा एन., बेळगाव येथील माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर, बेंगळूर पोलीस मुख्यालयातील पोलीस निरीक्षक एम. श्रीनिवास राव, रायचूर येथील देवदुर्ग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ, बेंगळूर पूर्व विभाग येथील महिला पोलीस स्थानकाच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रत्नम्मा के., आणि बेंगळूर येथील सीआयडी युनिटचे सिव्हिल हेड कॉन्स्टेबलबालकृष्ण वाय. यांचा समावेश आहे. म्हैसूर येथील प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. चंद्रशेखर यांना न्यायवैद्यक विज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.