राज्यातील आठ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक
गुरुराज कल्याणशेट्टी, श्रीशैल ब्याकोड यांचा समावेश
बेळगाव : गुन्हेगारी प्रकरणांचा तपास व गुप्तचर विभागात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या कर्नाटकातील आठ पोलीस अधिकाऱ्यांना 2025 सालासाठीचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक जाहीर झाले आहे. यामध्ये बेळगाव शहर व जिल्ह्यातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शुक्रवारी दक्षता पदकाचे मानकरी ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर झाली आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयातील सीसीआरबी विभागाचे पोलीस निरीक्षक गुरुराज ईश्वर कल्याणशेट्टी व मुडलगीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल के. ब्याकोड यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक जाहीर झाले आहे. हासनचे अतिरिक्त पोलीसप्रमुख एम. के. तम्मय्या, बेंगळूर येथील के. जी. हळ्ळी उपविभागाचे एसीपी प्रकाश राठोड, सुद्दगुंटेपाळ्याचे पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ, गुप्तचर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सी. व्ही. दीपक, पोलीस उपनिरीक्षक कल्लाप्पा एच. आतनूर, कारकळचे नक्षलविरोधी पथकातील हवालदार टी. एम. मधुकर यांनाही दक्षता पदक जाहीर झाले आहे.