महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

युनियन जिमखान्याचा आठ गड्यांनी विजय

09:54 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केएससीए 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित 19 वर्षांखालील केएससीए आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने के आर शेट्टी लायाज संघाचा 8 गड्यांनी पराभव करून 4 गुण मिळविले. अष्टपैलू कामगिरी केलेल्या प्रतिक खर्डेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. बेळगावच्या केएससीए मैदानावरती खेळविण्यात आलेल्या या सामन्यात के आर शेट्टी लायाज संघाने प्रथम फलंदाजी करताना 42.4 षटकात सर्वगडी बाद 146 धावा केल्या. त्यात आदी नलवडेने 4 चौकारासह 54, आनंद जाधवने 8 चौकारासह 38, शुभम खोतने चार चौकारासह 24 तर सिद्धार्थने 13 धावा केल्या. जिमखानातर्फे प्रतिक खर्डेने 21 धावात 4 तर प्रणित चौगुले, स्वरूप साळुंखे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखान्याने 15.2 षटकात 2 गडी 78 धावा केल्या होत्या. यावेळी दमदार पावसाने हजेरी लावल्याने धावसंख्येच्या सरासरीच्या जोरावर युनियन जिमखाना संघाला विजयी घोषित करण्यात आले. त्यात साईराज साळुंखेने 4 चौकारांसह नाबाद 33, प्रतिक खर्डेने नाबाद 1 षटकारास 15 तर अथर्व बेनकेने 13 धावा केल्या. के आर शेट्टीतर्फे शुभम खोत व गौरव कांटे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article