For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युनियन जिमखाना, साई स्पोर्ट्स संघ विजयी

10:05 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
युनियन जिमखाना  साई  स्पोर्ट्स संघ विजयी
Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना व साई फार्म स्पोर्ट्स क्लब  संघानी  विजय मिळवले. साईराज वॉरियर्स, फोदार सीसीआय, रोहन टेडर्स बीएससी व भाटे वारीयर्स संघानी कॉलिफायर्स व इलीमनेटर फेरीत प्रवेश केला आहे. युनियन जिमखाना मैदानावर पहिला सामन्यात के आर शेट्टी किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.2 षटकात सर्व बाद 132 धावा केल्या. त्यात कर्णधार स्वप्नील येळवेने 4 चौकार एक षटकारांसह 49,  हबीब ताडपत्रीने 4 चौकारांसह 23 धावा केल्या. सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना तर्फे अद्वेत साठे व अक्षय जगताप यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर पार्थ पाटील आनंद कुन्नूर व केतज कोल्हापुरे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाने 16.4 षटकात 6 गडी बाद 138 धावा करून हा सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात केतज  कोल्हापुरेने 6 चौकार 2 षटकारांसह 46, विनोद देवडीगाने 17 तर  अक्षय जगतापने 2 षटकार एक चौकारांसह 21 धावा केल्या. के. आर. शेट्टी किंग्ज तर्फे किरण तारळेकर व स्वप्निल येळवे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात   इंडियन बॉईज संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 133 धावा केल्या. त्यात आर्यन कुंदपने सर्वाधिक 35, कवीश मुक्काणावर 2 षटकार एक चौकारांसह 30, तनिष्क नाईकने एक षटकार 3 चौकारांसह 27 धावा केल्या. साई फार्म स्पोर्ट्स क्लब तर्फे अमर घाळी व रामलिंग पाटील यांनी प्रत्येकी 2 तर वैभव कुरीबागीने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 16.2 षटकात 5 गडीबाद 134 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. अमर काळने 4 चौकार 3 षटकारांसह 59, रोहित पोरवालने 4 चौकारांसह 22, गणेश कंग्राळकरने 18 धावा केल्या. इंडियन बॉइज तर्फे तनिष्क नाईकने 2 तर सुशांत कोवाडकर व कवीश मुक्कण्णावर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रमुख पाहुणे मधुकर पाटील व संजय जाधव यांच्या हस्ते सामनावीर अक्षय जगताप व इम्पॅक्ट खेळाडू केतज कोल्हापुरे यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या सामन्यात प्रमुख पाहुणे मिलिंद पाटणकर व अमित साठे यांच्या हस्ते सामनावीर अमर घाळी व इम्पॅक्ट खेळाडू तनिष्क नाईक यांना चषक देऊन गौरविण्यात आले. गुरूवारी पहिला कॉलिफारचा सामना :- साईराज वॉरियसं वि. पोददार सीसीआय  यांच्यात खेळविण्यात येणार ओ. तर दुसरा इलिमनेटर सामना रोहन टेडर्स बीएससी वि. भाटे वॉरियर्स यांच्यात होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.