For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युनियन जिमखाना अंतिम फेरीत

09:43 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
युनियन जिमखाना अंतिम फेरीत
Advertisement

बेळगाव : मडगाव येथे स्पोर्ट्स वीक क्लब मडगाव आयोजित दुसऱ्या एक्सपोजर चषक 13 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत बेळगावच्या युनियन जिमखाना संघानी उपांत्य फेरीत मुंबईच्या टीम वर्क्स संघाचा 9 गड्याने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. कौस्तुभ पाटील सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मडगाव गोवा येथील एस ए जी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत  मुंबईच्या टीम वर्क्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 17.3 षटकात सर्व बाद 57 धावा केल्या. त्यात अर्णव तांबेने 14, तनिष्क कदमने 11 धावा केल्या. युनियन जिमखाना तर्फे कौस्तुभ पाटीलने 2 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल युनियन जिमखाना संघाने 8.2 षटकात एक गडी बाद 58 धावा जमवत हा सामना गड्यांनी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यात शाहऊख धारवाडकरने 3 चौकार 25, विश्रुत कुंदरनाडने 3 चौकारांसह 22 धावा केल्या. मुंबई संघातर्फे अमय तांबेने एक गडी बाद केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.