महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

युनियन जिमखान्याची मडगाव क्रिकेट अकादमीवर मात

10:21 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित गोव्याच्या मडगाव क्रिकेट अकादमी विऊद्ध युनियन जिमखाना यांच्यातील एकमेव क्रिकेट सामन्यात बेळगावच्या युनियन जिमखाना संघाने मडगाव क्रिकेट अकादमीचा 5 गड्यांनी पराभव केला. अष्टपैलू कामगिरी करणारा मिलिंद चव्हाण सामनावीर ठरला. 22 षटकांच्या झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मडगाव क्रिकेट अकादमीने 21.3 षटकात सर्व गडी बाद 176 धावा केल्या. माजी रणजीपट्टू आंबे पर्वतकरने 30 चेंडूत 2 षटकार, 8 चौकारांसह 55, दर्शन कारकरने 8 चौकारांसह 40, आगिलदास आलमपट्टाने 32 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे कर्णधार मिलिंद चव्हाण, प्रसाद नाकाडी यांनी प्रत्येकी 3, राहुल नाईक व सचिन साळुंखे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल युनियन जिमखानाने 20.5 षटकात 5 गडी बाद 180 धावा करुन सामना 5 गड्यांनी  जिंकला. कर्णधार माजी रणजीपटू मिलिंद चव्हाणने चौफेर टोलेबाजी करताना 41 चेंडूत 4 षटकार व 11 चौकारांसह आक्रमक 81 धावा केल्या. सचिन साळुंखेने 1 षटकार, 4 चौकारास 31, प्रसाद नाकाडीने 3 चौकारांसह 28, राहुल शिंदेने 12 व रवी पिल्लेने नाबाद 11 धावा केल्या. मडगाव क्रिकेट अकादमीतर्फे प्रशांत लोटलीकर व अमेय कोसंबे यांनी प्रत्येकी 2 तर करण डोंगरेने 1 गडी बाद केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article