महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मेट्रो, विमानतळ प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

06:22 AM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन मेट्रो प्रकल्पांसह दोन नवीन विमानतळांच्या बांधकामालाही मंजुरी दिली आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. त्यानुसार बेंगळूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात दोन कॉरिडॉर बांधण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. बेंगळूर मेट्रोशिवाय महाराष्ट्राच्या मेट्रो प्रकल्पालाही मान्यता देण्यात आली.

Advertisement

केंद्रीय रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प मंजूर झालेला दुसरा मेट्रो प्रकल्प आहे. हा मेट्रो प्रकल्प 12,200 कोटी ऊपये खर्चून पूर्ण केला जाणार आहे. मंजूर झालेला तिसरा प्रकल्प पुणे मेट्रोचा पहिला टप्पा आहे. दक्षिणेकडे प्रस्तावित मेट्रो रेल्वेचा हा मार्ग स्वारगेट ते कात्रजपर्यंत 5.46 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 2,954.53 कोटी ऊपये आहे. ही लाईन 2029 पर्यंत कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे.

बिहार, बंगालमधील विमानतळांना मान्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाने पश्चिम बंगालमधील बागडोगरा आणि बिहारमधील बिहटा येथे 2,962 कोटी ऊपयांच्या विमानतळ प्रकल्पांना मंजुरी दिली. बागडोगरा विमानतळावर अंदाजे 1,549 कोटी ऊपये खर्चून नवीन नागरी एन्क्लेव्ह मंजूर करण्यात आला आहे. बिहारमधील बिहटा येथे नवीन नागरी एन्क्लेव्हलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्याची अंदाजे किंमत 1,413 कोटी ऊपये आहे. या विमानांसाठी 10 पार्किंग बे आणि दोन लिंक टॅक्सीवे सामावून घेऊ शकतील अशा एप्रनच्या बांधकामाचा या प्रकल्पात समावेश आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article