मडगावमध्ये रावणफोंड सर्कलजवळ अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला
01:14 PM Sep 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मडगाव : रावणफोंड सर्कलजवळील बसथांब्याच्या मागील बाजूस ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. रविवारी ही घटना उघडकीस आली.
Advertisement
घटनेची माहिती मिळताच मडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून, तिच्या ओळखीबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. तसेच महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी मडगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Advertisement
Advertisement