For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Crime काळज येथे आढळला अनोळखी मृतदेह

10:01 PM Jun 21, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara crime काळज येथे आढळला अनोळखी मृतदेह
Advertisement

लोणंद : काळज परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची नोंद लोणंद पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याबाबतची खबर प्रदीप आत्माराम गाढवे यांनी दिली आहे.

Advertisement

मयत हा अनोळखी पुरुष असून त्याचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे आहे. मयताच्या अंगावर राखाडी रंगाचा हाफ टी-शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट व चॉकलेटी रंगाची अंडरवेअर होती. तसेच त्याच्या उजव्या पायाच्या पोटरीवर गोंदलेले निदर्शनास आले आहे.

सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एम. हेगडे करीत असून मार्गदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी एस. जायपत्रे करीत आहेत. तरी वरील वर्णनावरून कोणास मयताबाबत माहिती असल्यास किंवा ओळख पटत असल्यास तत्काल लोणंद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.