For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॅडमिंटनपटूचा दुर्दैवी मृत्यू

06:22 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
बॅडमिंटनपटूचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठांच्या बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत रविवारी मुलांच्या विभागातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात चीनचा 17 वर्षीय बॅडमिंटनपटू झेंग झीचा बॅडमिंटन कोर्टवरच तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. चीनचा झेंग आणि जपानचा केवानो यांच्यात एकेरीचा हा सामना सुरू होता. या सामन्यातील पहिल्याच गेम्समध्ये स्मॅशचा फटका मारत असताना झेंग अचानकपणे कोर्टवर कोसळला. लागलीच त्याच्यावर इलाज करण्यासाठी प्रथमोपचार करण्याकरीत काही डॉक्टर्स उपलब्ध झाले. पण तो बेशुध्द झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि तो मृत झाल्याचे घोषित केले. 17 वर्षीय बॅडमिंटनपटूचा या दुर्दैवी मृत्यूबद्दल बॅडमिंटन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Advertisement

.