महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सरवडेतील बालकाचा नाधवडे येथे कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू 

08:01 PM Apr 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
rowning in a canal
Advertisement

 सरवडे प्रतिनिधी

नाधवडे (ता. भुदरगड) येथे आजोळी आलेल्या सरवडे येथील श्रीराज सचिन पाटील या नऊ वर्षांच्या बालकाचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली आहे.

Advertisement

याबाबत माहिती अशी राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील कुमार विद्या मंदिर शाळेत तिसरीत शिकणारा श्रीराज पाटील हा चैत्र यात्रेनिमित्त नाधवडे येथे आजोळी गेला होता. आज लहान मावस भाऊ व शेजारची लहान मुलासमवेत तो गावाजवळ असणाऱ्या कालव्याच्या पाण्यात आंघोळीला गेला होता .त्याने कालव्यात उडी मारली तो वरती आलाच नाही .मुलानी शोधाशोध केली असता उशिरा सापडला. त्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता .या घटनेची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली आहे .ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे शवविच्छेदन करण्यात आले.

Advertisement

सरवडे येथे विद्या मंदिरमध्ये तिसरीच्या वर्गात शिकणारा श्रीराज हा अतिशय हुशार विद्यार्थी होता.  नुकत्याच झालेल्या तिसरीच्या विविध खाजगी परीक्षेत त्याने धवल हे संपादन केले होते. त्याचे गावांमध्ये डिजिटल बोर्ड ही लावण्यात आले होते. अशा हुशार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

Advertisement
Tags :
NadhwadeSarwadeUnfortunate death
Next Article