For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घराची भिंत कोसळून 9 मुलांचा दुर्दैवी मृत्यू

06:49 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
घराची भिंत कोसळून 9 मुलांचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement

मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

Advertisement

► वृत्तसंस्था/ भोपाळ

मध्यप्रदेशात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सागर जिह्यातील शाहपूर परिसरात रविवारी पहाटे पावसामुळे 50 वर्षे जुन्या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत 9 मुलांचा ढिगाऱ्याखाली दबल्याने मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतेक जण 10 ते 14 वर्षांचे आहेत.

Advertisement

भिंत कोसळण्याची दुर्घटना घडलेल्या जीर्ण घराजवळ ऊद्री (शिवलिंग) बांधण्याचे काम सुरू होते. ऊद्री बांधणाऱ्या मुलांवर घर कोसळले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक आमदार आणि माजी मंत्री गोपाल भार्गव यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

सागर येथील दुर्घटनेनंतर आता सरकारही अॅक्शन मोडवर आले आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दिले आहेत. यासोबतच चार लाख ऊपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले.

काँग्रेसने सरकारवर साधला निशाणा

यापूर्वी शनिवारीही रीवा येथे भिंत कोसळून 4 मुलांचा मृत्यू झाला होता. आता काँग्रेसने या मुद्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भोपाळमध्ये प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी म्हणाले की, संपूर्ण मध्यप्रदेशातील शाळांची अवस्था बिकट आहे. शिक्षक नाही. इमारती नसलेल्या अनेक शाळा आहेत. गेल्या 10 वर्षात 50 लाख मुलांनी शाळा सोडली आहे. रीवा येथे घडलेल्या दुर्घटनेला मध्यप्रदेश सरकार आणि शिक्षण विभाग जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.

Advertisement
Tags :

.