For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचा दणदणीत विजय

09:48 PM Dec 10, 2023 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचा दणदणीत विजय
Advertisement

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संस्थेवर निर्विवाद यश

Advertisement

सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गजानन सावंत यांच्या नेतृत्वाखाली उत्कर्ष पॅनलने सर्व 11 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला.  सहकार क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पहिल्यांदाच घवघवीत यश संपादन करून सहकारात  आपला पाया रोवला आहे. सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेची रविवारी निवडणूक झाली. त्यात विद्यमान चेअरमन सुरेश सावंत यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचे सदानंद गंगाराम चव्हाण ,संजय कृष्णा गवस, गुणाजी अर्जुन गावडे ,संदीप राजाराम माळकर, पुरुषोत्तम रामचंद्र राऊळ, नारायण भदू सावंत, संजय विठ्ठल गावडे हे उमेदवार निवडून आले .विद्यमान चेअरमन सुरेश केशव सावंत, विष्णू वासुदेव गोसावी पराभूत झाले. सायंकाळी मतदान संपल्यानंतर मतमोजणी झाली .या संस्थेच्या निवडणुकीसाठी चार जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुभाष नाईक ,मोहिनी रंजन गवस, मुकुंद लक्ष्मण मेस्त्री, उज्ज्वला ज्ञानेश्वर जाधव अशा बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक निकाल झाल्यानंतर उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांनी जल्लोष केला. त्यावेळेस गजा सावंत, आबा सावंत, अशोक परब तसेच विजयी उमेदवार उपस्थित होते .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजन अरवंदेकर यांनी काम पाहिले.

Advertisement
Advertisement
Tags :

.