For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जमिनीतील पाताळ लोक

06:43 AM Mar 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
जमिनीतील पाताळ लोक
Advertisement

लोकांना दिसते दंग करणारे दृश्य

Advertisement

जगात काही ठिकाणं ही जमिनीखाली वसलेली आहेत. यातील काही ठिकाणं ही तप्त वातावरणापासून वाचण्यासाठी निर्माण करण्यात आली आहेत. उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी पारंपरिक स्वरुपातील गुहेत लोक राहत असतात. अशाचप्रकारची एक जागा ट्युनिशियामध्ये आहे.

दक्षिण ट्युनिशियात असलेल्या या छोट्या गावाचे नाव मटमाटा आहे. सर्वसाधारणपणे जमिनीखाली राहणारे लोक पर्वतांनजीक स्थायिक होत असतात. परंतु येथील लोक जमिनीत एक मोठा ख•ा खोदून स्वत:चे घर निर्माण करतात. सर्वप्रथम ख•ा खोदल्यावर तेथे गुहेसारख्या खोल्यांची निर्मिती केली जात असते. ज्यात येथील लोक राहत असतात. अशाप्रकारचे खुले ख•s हे एकप्रकारे अंगणाप्रमाणे काम करत असतात. कधीकधी हे ख•s एक मोठ्या भूमिगत भुलभुलैया निर्माण करत दरीसारख्या मार्गांच्या माध्यमातून नजीकच्या अन्य ख•sवजा अंगणांशी जोडलेले असतात.

Advertisement

मटमाटा आणि ट्युनिशियातील काही अशाप्रकारची शहरे बलुआ दगडाच्या एका शेल्फवर स्थित आहेत. येथील दगड साध्या अवजारांनी खोदकाम करता येण्यासारखा आहे. येथील या घरांना अनेक वर्षांपर्यंत नुकसान पोहोचत नाही. येथील लोकांना बेरबर्स म्हटले जाते, जे एक हजार वर्षापेक्षाही अधिक काळापासून अशाप्रकारे जमिनीत घरं खोद आहेत.

मटमाटा पठारात अशाप्रकारची घरं आढळून येतात. लीबिया आणि ट्युनिशियादरम्यान एकमात्र भूमिमार्ग असलेल्या संकीर्ण पट्ट्यानजीक हे पठार आहे. या क्षेत्रावर वेगवेगळ्या काळात अनेक आक्रमण झाली, यामुळे येथील लोकांना पठारापासून मागे हटणे भाग पडले. अशा स्थितीत त्यांनी पर्वतांमध्ये उंच घरं खोदण्यास सुरुवात केली. परंतु अरब आक्रमकांसोबत मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्यावर बेरबर्स स्वत:ला अधिक सुरक्षित समजू लागले. अशा स्थितीत त्यांनी मैदानी भागात वस्ती निर्माण करण्यास सुरुवात केली.

सर्वसाधारणपणे जगभरात जमिनीवर घरांची निर्मिती केली जाते, तर मटमाटाचे लोक जमीन खोदून स्वत:चे घर निर्माण करतात. ही घरं अत्यंत मजबूत आणि अनोखी असतात. यामुळे हे ठिकाण आता पर्यटन केंद्र ठरले आहे. गाजलेला हॉलिवूड चित्रपट स्टार वॉर्सचे चित्रिकरण देखील येथेच पार पडले होते.

Advertisement
Tags :

.