For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सायबर माफियांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन !

06:22 AM Feb 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
सायबर माफियांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन
Advertisement

अंडरवर्ल्डचा एक काळ रक्तरंजित असा होता. खुलेआम गोळीबार, हत्यासत्र सुऊ होते. पैसा, दहशत आणि स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी अंडरवर्ल्डमध्ये हा प्रकार सुऊ होता. कालांतराने मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर नावाचे ब्रम्हास्त्र बाहेर काढताच अंडरवर्ल्डचे नामोनिशान मिटले असा समज निर्माण झाला. पण नाही सध्या अंडरवर्ल्डचे सायबर माफियांशी असलेले कनेक्शन समोर आले असून, सध्या पैशासाठी गुप्त पद्धतीचा सायलेंट वॉर सुऊ आहे.

Advertisement

देशाच्या आर्थिक राजधानीतील भलेही खुलेआम चालणारे अंडरवर्ल्ड संपले आहे. तरी छुप्या पद्धतीने अंडरवर्ल्डच्या कारवाया म्हणा किंवा अंडरवर्ल्ड अद्यापही जिवंत आहे. ज्या ठिकाणी पैसे कमावण्याचा शॉर्टकट किंवा बेकायदेशीर मार्ग असेल, तिथे अंडरवर्ल्डची एंट्री असते. 1980-90 चा काळ हा अंडरवर्ल्डचा खुलेआम रक्तरंजित काळ होता. हा काळ असा होता की ज्याची दहशत, त्याचे राज्य. यामुळे अनेक गँग आणि गँगस्टर आपले नशिब आजमाविण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र वेळीच मुंबई पोलिसांनी बाहेर काढलेल्या एन्काऊंटर नावाच्या ब्रम्हास्त्राने अंडरवर्ल्ड खिळखिळे केले. यादरम्यान अनेक गुन्हेगारांनी आपली स्वत:ची छाप सोडली. ती आजतागायत चर्चेत आहे. खुलेआम होणारा गँगवॉर जरी संपला तरी सध्या स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी कोणी लॉरेन्स बिश्नोई नावाचा भुरटा फडफड करीत आहे. मात्र त्याची डाळ अद्याप शिजली नाही की शिजणार देखील नाही. गँगवॉर संपले, खुलेआम खंडणी तसेच अपहरण संपले, ड्रग्जच्याबाबतीत देखील पोलीस सतर्क झाले. अशात पैसा कमवायचा कसा? याचे उत्तर अंडरवर्ल्डला मिळाले असून, सध्या त्यांनी हायप्रोफाईल सायबर माफियांची मदत घेत काळा कारभार सुऊ केला असून, या सायबर माफियांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन देखील मिळण्यास सुऊवात झाली आहे.

डिजिटल अटक, शेअर बाजार घोटाळे व इतर विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीत व्हॉट्सअॅप व व्हीआयपी कॉलचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सायबर माफियांनी सुऊवात केली आहे. जेणेकऊन यामध्ये सायबर माफिया आणि अंडरवर्ल्डची ओळख गुप्त राहील. मात्र व्हॉट्सअॅप किंवा इंटरनेट कॉल टॅप केले जाऊ शकत नाहीत, या खुळ्या आभासी वास्तवात जगणाऱ्या माफियांना हे माहीत नाही की, सुरक्षा एजन्सी आता सर्व प्रकारच्या कॉलचा मागोवा घेण्यास व टॅप करण्यास सक्षम आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबई पोलीस किंवा पेंद्रीय तपास यंत्रणांना कॉल टॅपिंग दरम्यान अंडरवर्ल्डच्या सहभागाबद्दल काही ठोस पुरावे देखील सापडले आहेत. वास्तविक कंबोडिया व म्यानमारमधील 2024 चा नोकरी घोटाळा तेव्हा चर्चेत आला जेव्हा असे उघड झाले की, सुमारे 5 हजार भारतीय घोटाळयात अडकले आहेत. भारतीयांना उच्च पगाराच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवून तिथे नेण्यात आले आणि त्यानंतर त्यांना धमकी देऊन भारतीय नागरिकांविऊद्ध सायबर फसवणूक करण्यास भाग पाडण्यात आले. भारतात परतलेल्या अनेक पीडितांनी पेंद्रीय संस्थांना सांगितले आहे की, त्यांना पाकिस्तानी एजंट्सद्वारे भरती करण्यात आले आहे. फॉरेन्सिक तपासणी दरम्यान, भारतीयांच्या भरतीशी संबंधित चॅट आणि कॉल्सच्या आयपी लॉगसह डिजिटल फूटप्रिंट्स थेट पाकिस्तानमधील हँडलर्सकडे निर्देशित करतात.

Advertisement

पीडितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जेव्हा हे आयपी अॅड्रेस पडताळले   गेले, तेव्हा ते पाकिस्तानमधील सर्व्हरशी जोडलेले असल्याचे आढळून आले. यामुळे उत्तर प्रदेश, पंजाब, मुंबई, तेलंगणा आणि केरळसारख्या राज्यांमधील बेरोजगार तऊणांना बळी पाडणारे एक समन्वित नेटवर्क उघड झाले. डिसेंबरमध्ये दिल्ली येथे झालेल्या दोन दिवसांच्या ‘दहशतवादविरोधी परिषद 2025’ मध्ये या संवेदनशील मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. पाकिस्तानशी असलेल्या लिंक शोधल्यानंतर पेंद्रीय एजन्सींनी या आयपी

अॅड्रेसची संशयास्पद म्हणून नोंदणी केली आहे. ही ‘संशयास्पद नोंदणी’ राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवर आधारित आहे आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय पेंद्राने विकसित केली आहे. या डेटाबेसमध्ये अंदाजे 14 लाख सायबर गुन्हेगारांचा डेटा आहे, जो संशयास्पद व्यवहार रोखण्यासाठी सर्व बँकिंग संस्थांसोबत शेअर केला जातो. ताज्या आकडेवारीनुसार या संशयित नोंदणीचा वापर करून फसवणूक करून लुटलेली 5 लाख 54 हजार 865 खाती गोठवण्यात आली आहेत. तसेच आजपर्यंत 15

लाख 10 हजार 800 संबंधित खात्यांची ओळख पटली असून अंदाजे 2 लाख संशयास्पद व्यवहार रोखण्यात आले आहेत. यामुळे भारतीयांचे 7 हजार 980 कोटी ऊपयांचे नुकसान होण्यापासून वाचवण्यात यश आले आहे. मात्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे, कारण भारतीयांना लक्ष्य करणारे हे घोटाळे प्रामुख्याने आग्नेय आशियातील उच्च सुरक्षा क्षेत्रांमधून चालविणाऱ्या चिनी

ऑपरेटर्सद्वारे चालवले जात आहेत.

दरम्यान, भारतीय सायबर गुन्हे समन्वय पेंद्राच्या धक्कादायक आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, गेल्या सहा वर्षांत सायबर फसवणुकीच्या विविध प्रकारांमध्ये भारतीयांची 52 हजार 976 कोटींपेक्षा जास्त फसवणूक झाली आहे. सायबर गुह्यांमुळे दरमहा भारतीय अर्थव्यवस्थेला सरासरी 1 हजार कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान होत आहे. तसेच असा अंदाज आहे की, अपहरण झालेले 20 हजारहून अधिक भारतीय अजूनही आग्नेय आशियातील काही ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांना भारतीयांच्या फसवणुकीसाठी भाग पाडले जात आहे. त्यामुळे सुरक्षा संस्थांचा असा विश्वास आहे की, अंडरवर्ल्ड आणि पाकिस्तानच्या सहभागामुळे हे प्रकरण केवळ आर्थिक फसवणूक नसून एक प्रमुख राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनला आहे. यासाठी प्रामुख्याने वृद्ध नागरिक यांना टार्गेट केले जात आहे. हे वृद्ध नागरिक म्हणजे सरकारी किंवा खासगी क्षेत्रातून सेवा निवृत्त झालेले आहेत. ज्यांनी आयुष्यभराची पुंजी कमाविली असेल अशांना निशाना करीत त्यांना डिजीटल अॅरेस्ट किंवा एका मोठ्या अधिकाऱ्याची भीती घालत त्यांच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचे काम सुऊ आहे. सायबर माफिया आणि अंडरवर्ल्डच्या या कारवायांनी आपली आयुष्यभरांची पुंजी तर गमावलीच मात्र अनेकांनी आत्महत्येचा पर्याय देखील निवडला. माफियांनी केवळ लुटण्याचाच प्रकार केला नाही तर हत्येचा गुन्हादेखील केला आहे. तेही ना कोणत्या गोळीबार किंवा अस्त्र-शस्त्राचा वापर करीत. कारण सायबर माफियांचे जे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. यामध्ये आता खुलेआम गोळीबार नाही की गँगवॉर नाही. तो आहे केवळ सायलेंट वॉर.

अमोल राऊत

Advertisement
Tags :

.