For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेगळेपण समजून घेताना...

06:33 AM Jul 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
वेगळेपण समजून घेताना
Advertisement

अलीकडेच आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस झाला. खरंतर संसाराची सुरुवात आहे. परंतु मॅडम मी फार अस्वस्थ आहे. मला अलीकडे असे वाटते की मी जे सांगते त्याकडे नवऱ्याचं फारसं लक्ष नसतं. खरंतर आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे परंतु हल्ली फार वादविवाद होतात. समजून घेण्यात काहीतरी गडबड होते का ते उमजत नाहीये.

Advertisement

बर! नेमकं काय होतं? कशाप्रकारे संवाद होतो हे सांगू शकतेस का? हो मॅडम आमच्यातला कालचा संवाद सांगते.

ती-आज खूपच वर्क लोड होते रे. काम संपता संपत नव्हतं. पाच मिनिटं वेळ नाही मिळत. एक एकदा खूप कंटाळा येतो बघ!

Advertisement

तो- अगं कशाला करतेस एवढी धावपळ? एवढी धावपळ करायची खरंच गरज आहे का? जॉबला दे सुट्टी आणि मस्त तुझ्या आवडीचं काय ते कर.

ती- मी कुठे म्हटलं मला जॉब आवडत नाही म्हणून? फक्त प्रॉब्लेम आहे की बॉसने ऑर्डर दिली की क्षणात फाईल रेडी लागते.

तो-आपण एकदा स्पष्ट बोलायचं त्याच्याजवळ

ती-हो तेच केलं मी आज. बघ ना, आज आईला फोन करायला वेळ मिळाला नाही. हल्ली असंच होतं.

तो- अगं त्यात काय एवढं? ती नक्की समजून घेईल.

ती- अरे एकटीच राहते ना ती...तिला गरज आहे माझी. तिला काय वाटत असेल?

तो-  उगीच काळजी करत राहतेस आणि मग तणावग्रस्त होतेस.

ती- (चिडून)मी तणावग्रस्त होते? सगळ्या धावपळीत दमछाक होते. मी ही माणूसच आहे ना. तू तू ना माझं नीट ऐकूनच घेत नाहीस.

तो- अगं इतका वेळ तुझंच तर ऐकतोय ना?

ती-  जाऊ दे, तुला काय त्यांचं..वगैरे वगैरे...

हे असं होतं मॅडम. मला कसलं टेन्शन असलं की मी घडाघडा बोलायला जाते, मला शेअर करावंसं वाटतं त्याच्याजवळ! त्याला प्रॉब्लेम असला की मात्र हा शांत असतो. काळजीपोटी मी विचारत राहते तर तो अधिकच वैतागतो. काही सूचना दिल्या तर म्हणतो मी काय कुक्कुले बाळ आहे का?

मैत्रिणी सोबत हा अनुभव शेअर करायला गेले की त्या म्हणतात ‘घरोघरी मातीच्या चुली’ आईला सांगितलं तर आई म्हणते चालायचं स्त्राr-पुरुषात हा स्वाभाविक फरक असतो. जवळपास सर्वत्र असे संवाद असतात. हळूहळू रुळशील तसे उलघडेल सारे. मॅडम मी पुरती गोंधळून गेले आहे. आमचे नाहीच पटले तर? मला त्याच्यासोबतच रहायचे आहे. घटस्फोट वगैरे असं काही होणार नाही ना? मी हसून म्हटलं असं काही होणार नाही. तू शांत हो.

नंतर स्त्राr-पुरुषांचे निसर्गदत्त गुणधर्म, मानसिक जडणघडण यावर चर्चा झाली. आपण काय केले पाहिजे समजुन घ्यायची, संवादाची काही टेक्निक्स यावर चर्चा झाली आणि ती शांत चित्ताने घरी गेली.

पती-पत्नीच्या नाजूक नात्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांच्यातील वेगळेपणा आणि मतभेद हाताळणे. अनेक जोडपी जेव्हा चर्चा करतात त्यावेळी काहींच्या बाबतीत त्याचे रूपांतर वादात होते आणि मग दोघांनाही कळायच्या आतच तू तू मैं मैं सुरू होते. स्त्राr-पुरुषातील वेगळेपण जर नीट समजून घेतले नाही तर वाद-विवाद आणि होणाऱ्या मनस्तापाला पर्याय नाही.

स्त्राr-पुरुषांचे नैसर्गिक गुणविशेष हे भिन्न भिन्न असतात, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. दोघांची व्यक्त होण्याची पद्धत, ताणतणावाची व्यवस्थापन पद्धत, समस्यांना उत्तर शोधण्याची पद्धत, प्रेम व्यक्त करायची पद्धत ही वेगवेगळी असते. बहुतांश स्त्राr-पुरुषांना काही काळाने एकमेकांना समजून घेण्याचं तंत्र गवसतं, एकमेंकातील वेगळेपण, त्याचा सहज स्वीकार हे तंत्र हळूहळू गवसू लागते. वरच्या उदाहरणातील तिच्यासारखेच ‘तिला’ वाटत असते की आपण जसा संवाद साधतो तसा संवाद त्याने साधावा, तिला समजून घ्यावे.

इतकी चर्चा करत राहण्यापेक्षा नेमका मुद्दा मांडून त्यावर उपाय शोधावा हा ‘त्याचा दृष्टिकोन’ असतो. त्यामुळे अनेकदा गोंधळ होतो. स्त्राrला जेव्हा समस्या असते त्यावेळी बहुतांश स्त्रिया संवाद साधत व्यक्त होत आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतात. अशावेळी तिच्या जोडीदाराकडून ‘ती एकटी नाही तो तिच्यासोबत आहे’ एवढा आश्वासक स्वर तिला ऐकायचा असतो. परंतु नैसर्गिक जडणघडणीतील स्वभाव भिन्नतेमुळे तो तिला समस्येवर उपाय सुचवतो आणि नेमकी गल्लत तिथेच होते. तिला वाटतं हा ऐकतच नाही, त्याला वाटतं ही अशी काय करते? हीचे ऐकूनच तर उपाय सुचवतोय ना. नुसते त्याने तिचं ऐकणं आणि काळजी करू नको हा. होईल सगळं नीट. मी आहे तुझ्यासोबत. असं म्हणणारे पुरुष आपल्या पत्नीचे हुशारीने मन जिंकतात. याउलट जेव्हा पुरुष एखाद्या समस्येतून जात असेल त्यावेळी तो आत्ममग्न होतो. तो शांत का? त्याला काही समस्या आहे का? हे बोलल्याशिवाय कळणार कसं? या प्रश्नांमुळे तिच्या स्वभाव गुणधर्मानुसार ती त्याला अनेक प्रश्न विचारते. परंतु त्याचा आत्मसमान दुखावला जाऊन तो अधिकच वैतागतो. माझ्या समस्या सोडवायला मी खंबीर आहे.(फक्त तू नुसता विश्वास तरी दाखव )असं कुठेतरी त्याच्या मनात असतं. पुरुष बोलत नसताना योग्य पद्धतीने समजून घेत त्यांना थोडं एकटे राहण्याची मुभा देत आधार देणे हे स्त्राr समोरील मोठं आव्हान असतं. स्त्राr पुरुषांची संवादाची पद्धत, व्यक्त होण्याची भाषा यात फरक असतो. परंतु ते उमजण्यासाठी थोडासा संयम, पुरेसा वेळ जाऊ देऊन समजून घेणं गरजेचं असतं. आपलं अस्तित्व न गमावता दोघांनाही छोटे छोटे बदल करणे, एकमेकांना समजून घेण्याचं कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे. जसे स्त्राrच्या ऐकण्याची गरज आणि तिला हवा असलेला आश्वासक स्वर हे गुपित त्याने लक्षात ठेवायला हवे तसेच स्त्रिया जशा भावना समजून घ्याव्यात, ऐकून घ्याव्यात, याबाबत हळव्या असतात. त्याचप्रमाणे स्वीकाराच्या बाबतीत त्याच्या मनाचाही एक हळवा कोपरा असतो, तिथे सुधारणा करण्यासाठी तुमची धडपड आहे याची जरी कुणकुण त्याला लागली की त्याच्या आत्मसन्मानाला धक्का बसतो, हे तिने लक्षात घ्यायला हवे. सहकार्य मागण्याची आणि करण्याची कला जोडप्याने आत्मसात करायला हवी.

वैवाहिक नात्यातील नातेसंबंध बदलण्यासाठी स्वभाव वैशिष्ट्यो समजून घेऊन त्यातील बदलते ऋतूही समजून घ्यायला हवेत. ज्यावेळी सुखाचे प्रसंग असतील त्यावेळी प्रवास सहज असतो. परंतु काही समस्यांच्या वेळी दोघांनीही कौशल्याने एकमेकांना समजून घेणे हितावह ठरते. वेगवेगळी स्वभाव वैशिष्ट्या असूनही एकत्र आलेल्या त्या जोडप्याचा प्रवास ज्यावेळी दीर्घकाळ होतो त्यावेळी एकमेकांखेरीज जीवनाची कल्पनाही अस्वस्थ करू लागते. जेव्हा जोडीदारांना एकमेकांच्या गरजा, इच्छा, आकांक्षा याबाबत एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्याची, सहकार्य मागण्याची परवानगी असेल आणि नाही म्हणण्याची दोघांनाही मुभा असेल त्यावेळी हे नाते खरंच सुदृढ नाते समजावे. स्त्राr-पुरुषातील नैसर्गिक भिन्न स्वभाव विशेष असूनही अनेक जोडपी सुदृढ नाते राखत वर्षानुवर्षे सहजीवनाचा प्रवास करतात. एकमेकांना समजून घेत, संयम राखत हा प्रवास झाला तर तो सुखावह होतो हे मात्र खरे!!

- अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :

.