For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपा अधिकारी-नगरसेवकांमधील छुपा संघर्ष चव्हाट्यावर

10:46 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
मनपा अधिकारी नगरसेवकांमधील छुपा संघर्ष चव्हाट्यावर
Advertisement

महापालिकेच्या कामकाजाची आता प्रशासकीयसह राजकीय वर्तुळात चर्चा

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेतील अधिकारी आणि नगरसेवकांमधील छुपा संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. गेल्या चार वर्षांपासून विकासकामे व इतर कामांवरून अधिकारी व नगरसेवकांमध्ये कायम छुपा संघर्ष सुरू आहे. पण बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेवेळी तो जगजाहीर झाला. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजाची चर्चा आता प्रशासकीयसह राजकीय वर्तुळात सुरू आहे. महानगरपालिकेतील एखादा अधिकारी नगरसेवकांचे काम करून देण्यास विलंब करत असेल तर तशा अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. बेकायदेशीर कामे करून देण्यासाठी अधिकाऱ्यांवर काही नगरसेवक दबावतंत्र वापरत आहेत. पण तशी कामे करून देण्यास अधिकारी धजावत नसल्याने त्यांच्यावर सर्वसाधारण सभेत आरोप करून चारित्र्यहनन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वारंवार एखादा विषय उकरून काढत अधिकाऱ्यांना लक्ष्य बनविण्याचे प्रकार सुरू असल्याने अधिकारीवर्ग वैतागला आहे.

मध्यंतरी एसआयआरच्या कामात महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी गुंतले होते. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाला. पण अशावेळीही अधिकाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार सुरूच होते. काही नगरसेवक विभागीय कार्यालयांसह महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात दिवसभर तळ ठोकून असतात. सांगितलेली कामे अधिकाऱ्यांकडून केली जात नसल्यास त्यांना सर्वसाधारण सभेत विषय काढला जाईल, असे सांगत धमकावले जात आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला छुपा संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. नगरसेवक शाहीदखान पठाण आणि संतोष जिरग्याळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. इतकेच नव्हे तर वारंवार असे प्रकार घडत असल्याने महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी बेमुदत संप पुकारून महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. अधिकारी व नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे विकासकामांवर परिणाम होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.