For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भूमिगत शहर, खडकांमध्ये चर्च

06:33 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भूमिगत शहर  खडकांमध्ये चर्च
Advertisement

ऐतिहासिक असण्यासोबत निसर्ग सौंदर्याची उधळण झालेल्या ठिकाणाला भेट द्यायची इच्छा असल्यास तुर्कियेच्या मध्य प्रांतातील कप्पाडोसियाचा अवश्य विचार करा. एकीकडे मनमोहक चिमण्या आणि प्राचीन खडकांच्या संरचना आहेत, तर दुसरीकडे सांस्कृतिक वारसा असलेले भाग असून तेथे खडकांमध्ये चर्च कोरण्यात आले आहे तसेच भूमिगत शहर देखील आहे.

Advertisement

लाखो वर्षांपूर्वी सेंट्रल एनाटोलियन क्षेत्रात ज्वालामुखीय विस्फोट झाले होते. याचमुळे तेथे कॅप्पाडोसिया फ्रायरीज निर्माण झाल्या. तेथे मोठ्या प्रमाणता राख गोठून प्रथम टणक आवरण तयार झाले आणि मग त्या सुंदर चिमण्यांमध्ये बदलल्या होत्या. सुमारे 130 फूट उंच हे टफ आगामी अनेक वर्षांमध्ये आकारात बदलत जाते.

 

कप्पाडोसिया जगात ख्रिश्चन धर्मासाठी सर्वात महत्त्वाचे प्रार्थनास्थळ आहे. 10 व्या आणि 11 व्या शतकादरम्यान या क्षेत्रात खडकांवर अनेक चर्च निर्माण झाले. अनेक प्राचीन चर्च तर असाधारण दागिन्यांच्या सौंदर्याने सजलेले होते. तेथे 600 पेक्षा अधिक चर्च आहेत. यातील काही चर्चमधील सुंदर भित्तिचित्र लोकांना चकित करून सोडतात.

Advertisement

कप्पाडोसियाचे सर्वात मोठे आकर्षण हॉट एअर बलूनद्वारे होणारी सैर आहे. येथे बायकिंग आणि हायकिंगदरम्यान सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो. परंतु कप्पाडोसया हॉट एअर बलूनिंग चमकदार प्राचीन दृश्याला पाहण्याची सर्वोत्तम पद्धत आहे.

कप्पाडोसियाचे भूमिगत शहर या क्षेत्राच्या यात्रेदरम्यान न विसरता येणाऱ्या अनुभवांपैकी एक आहे. यातील काही भूमिगत वस्ती चिंचोळ्या भुयारांच्या एका नेटवर्कशी जोडलेल्या आहेत. या क्षेत्रात जवळपास 36 भूमिगत शहरे असून कायमाली आणि डेरिनकुयू यातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात अधिक पाहिले जाणारे शहर आहे.

ज्वालामुखी टफमुळे कप्पाडोसिया एक मोठे द्राक्ष उत्पादक क्षेत्र आहे आणि वाइन निर्मितीचा एक मोठा इतिहास सामावून आहे. या भागातील वैशिष्ट्यांमुळे हे क्षेत्र स्वत:च्या वाइनसाठी देखील ओळखले जाते याचा पर्यटकांना विसर पडतो. येथे फिरण्यासाठी काही वायनरींमध्ये कपाडोक्या, तुरासन, कोकाबाग आणि सेनल  सामील आहे. काही सर्वात लोकप्रिय रेड आणि व्हाइट वाइन ब्रँड या क्षेत्रातील आहेत आणि पर्यटक वाइनची टेस्ट घेऊ शकतात.

कप्पाडोसिया स्वत:च्या अविश्वसनीय ओपन-एअर संग्रहालयासाठी ओळखले जाते, जे गोरेमे येथे आहे. गोरेमे ओपनर एअर संग्रहालय भागात सर्वाधिक पाहिले जाणारे आणि लोकप्रिय पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे. क्षेत्राच्या अन्य रॉक साइट्ससोबत हे संग्रहालय तुर्कियेतील पहिले संग्रहालय होते, जे 1985 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत सामील करण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.