For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाशिकमध्ये आढळला बेवारस मृतदेह, घातपाताचा संशय

12:46 PM Feb 12, 2025 IST | Pooja Marathe
नाशिकमध्ये आढळला बेवारस मृतदेह  घातपाताचा संशय
Advertisement

मृतदेहाजवळ दारुची बाटली आणि ग्लासही आढळला
नाशिक येथील पंचवटीच्या पेठ रोड परिसारतील घटना
नाशिक
नाशिकमधील पंचवटीच्या पेठ रोड परिसरात भरवस्तीत बेवारस मृतदेह सापडल्याने, अचानक खळबळ उडाली आहे. या अज्ञान इसमाच्या डोक्यावर जबर मार लागल्या असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यामध्ये घातपाताचा संशयही व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, नाशिकच्या पंचवटीच्या पेठ रोड परिसरात बुधवार (दि.१२) रोजी एका अज्ञाक इसमाचा मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ दारुची बाटली आणि ग्लाही आढळून आला आहे. दारु पिण्याच्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र हत्ये मागचे गूढ अजून कायम आहे. घटनास्थळी पोलिस पथकासह श्वान पथक, फॉरेन्सिक पथकही दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.