For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्ले समुद्रात कर्नाटकातील अनधिकृत ट्रॉलिंग मासेमारी नौका पकडली

12:35 PM Jan 13, 2026 IST | अनुजा कुडतरकर
वेंगुर्ले समुद्रात कर्नाटकातील अनधिकृत ट्रॉलिंग मासेमारी नौका पकडली
Advertisement

मत्स्यव्यवसाय विभागाची गस्ती दरम्यान कारवाई

Advertisement

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ला समोरील समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्री.गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) हे सोमवारी रात्री नियमित गस्त घालत होते. यावेळी कर्नाटक राज्यातील एक नौका ही महाराष्ट्राच्या जलधीक्षेत्रात वेंगुर्ला समोरील समुद्रात अनधिकृतरित्या ट्रॉलिंग मासेमारी करत असताना पकडली. या नौकेवर नौका तांडेलसह इतर ६ खलाशी होते. सदर नौका जप्त करून वेंगुर्ला बंदरात ठेवण्यात आली आहे आणि त्यावर असणाऱ्या मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरु आहे.वेंगुर्ले येथे अंमलबजावणी अधिकारी श्री.गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्य. विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) यांनी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक यांचे सहकार्याने मा.सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत या परप्रांतीय नौकेवर सदर कारवाई केली आहे. श्रीमती प्रमुक्ता सुनिल करकेरा, किडियूर, उडपी, कर्नाटक यांची नौका एकापर्निका ३, नों. क्र. IND-KA-२-MM-५४३९ या क्रमांकाची ही नौका अनधिकृतरीत्या मासेमारी करत होती. ती नौका पकडून वेंगुर्ले बंदरात आणण्यात आली आहे. नौकेवरील मासळीचा लिलाव प्रक्रिया पूर्ण करून अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा.सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांचे न्यायालयात ठेवण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.