For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उपांत्य लढतींसाठी पंचांची घोषणा

06:02 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
उपांत्य लढतींसाठी पंचांची घोषणा
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीसाठी आयसीसीने इलाईट पंच पॅनेलमधील अव्वल पंच व सामनाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे.

बुधवारी न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकातामध्ये पहिली उपांत्य लढत होणार असून या सामन्यासाठी रिचर्ड इलिंगवर्थ व अॅलेक्स व्हार्फ यांच्यावर मैदानी पंचांची जबाबदारी देण्यात आली आहे. इलिंगवर्थ यांनी मागील टी-20 वर्ल्ड कपमध्ये द.आफ्रिका व अफगाणिस्तान यांच्यात उपांत्य लढत झाली होती, त्यावेळीही त्यांनी पंचगिरी केली होती. व्हार्फ यांनी सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीतील याच दोन संघांविरुद्ध झालेल्या सामन्यात पंचगिरी केली आहे. भारताचे नितीन मेनन हे तिसरे पंच तर रॉड टकर हे या सामन्यासाठी चौथे पंच असतील. सामनाधिकारी म्हणून भारताच्या जवागल श्रीनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

दुसरा उपांत्य सामना भारत व इंग्लंड यांच्यात गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 5 रोजी होणार असून ख्रिस गॅफनी व अल्लाहुद्दीन पालेकर हे मैदानी पंचांचे काम पाहतील. 2024 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमधील उपांत्य सामना याच दोन संघांत झाला होता आणि त्या सामन्यातही गॅफनी यांनी पंचगिरी केली होती. पालेकर मात्र या वर्ल्ड कपमध्ये पंचगिरी करीत आहेत. त्यात इंग्लंडचे सामने व भारताचा नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यांचा समावेश आहे. अॅड्रियन होल्डस्टॉक हे तिसरे पंच व पॉल रॅफेल चौथ्या पंचांची जबाबदारी सांभाळतील. अँडी पायक्रॉफ्ट हे सामनाधिकारी असतील.

भारत हा या स्पर्धेचा विद्यमान विजेता असून जेतेपद स्वत:कडेच राखण्यासाठी आणि एकूण तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी त्यांना आणखी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.

Advertisement
Tags :

.