उमेश वरक यांच्यावर हृदय प्रत्यारोपण यशस्वी
आमदार जीत आरोलकर यांचे प्रयत्न यशस्वी : 2 तासांत दात्याचे हृदय सुरक्षित पोहोचवले
मोरजी : पेडणे येथील कर्तव्यदक्ष अग्निशामक जवान उमेश वरक यांच्या जीवनासाठी सुरू असलेली लढाई नव्या आशेने पुढे जात आहे. वरक हे हृदयविकारामुळे चेन्नई येथे उपचार घेत आहेत. अत्यंत नाजूक अवस्थेत डॉक्टरांना मदुराई (तामिळनाडू) येथील 19 वषीय दात्याकडून जुळणारे हृदय उपलब्ध झाले, मात्र तब्बल 8 तासांचा प्रवास हा मोठा धोका ठरत होता. प्रत्येक मिनिट मोलाचे असताना ही वेळेशी चाललेली शर्यत अत्यंत निर्णायक बनली.योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि तातडीची व्यवस्था यामुळेच उमेश वरक यांच्या जीवनासाठी आशेचा किरण निर्माण झाला. या संपूर्ण प्रक्रियेत मांद्रे मतदारसंघाचे आमदार जित आरोलकर यांनी अत्यंत संवेदनशीलता आणि जबाबदारीने भूमिका बजावली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ हालचाली केल्या. आवश्यक समन्वय साधत हेलिकॉप्टरची व्यवस्था करून मदुराई ते चेन्नई अवघ्या 2 तासांत दात्याचे हृदय सुरक्षित पोहोचवले. त्यांच्या तत्परतेमुळेच वेळेच्या मर्यादेत शस्त्रक्रिया शक्मय झाली आणि एका कुटुंबाला नवजीवनाचा आनंद मिळाला.