Ratnagiri News : खेर्डी पंचायत समिती गणात डोअर टू डोअर प्रचारातून उमेश खताते यांची आघाडी
खेर्डीत ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रभावी प्रचार
चिपळूण : ठाकरे शिवसेनेचे उमेदवार उमेश खताते यांनी खेर्डी पंचायत समिती गणात राबवलेला डोअर टू डोअर प्रचार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विकासाभिमुख विचार, सर्वसामान्यांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवरील ठोस भूमिका यामुळे खताते यांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. विकास हवा असेल तर स्वार्थाला नकार द्या, गावासाठी उभे राहणा-यांची साथ द्या, असे स्पष्ट आवाहन करत खताते यांनी प्रत्येक वस्ती, प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे.
पाणी, रस्ते, रोजगार, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी मांडलेली ठोस दृष्टी मतदारांच्या मनाला भिडत असल्याचे चित्र आहे. खेर्डीत यावेळी परिवर्तन घडवण्यासाठी ठाकरे शिवसेनाया शिलेदारानी गावात घरोघरी प्रााारावर भर दिला आहे. खेर्डीतील तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधताना खताते यांनी ‘तुमचं एक मत खेर्डीमध्ये परिवर्तन घडवू शकतं’ हा संदेश त्यांनी प्रभावीपणे पोहोचवला आहे.
या संवादात्मक प्रचारामुळे जनतेचा विश्वास दृढ होत असून, निवडणूक प्रचारात खताते यांची आघाडी स्पष्टपणे दिसून येत आहे. खेर्डीसाठी आजपर्यंत काय केले आहे. पुढील पा वर्षात खेर्डाया सर्वांगीण विकासासाठी काय करणार आहे, या सुस्पष्ट अहवाल आणि ठोस वाननामा जनतेसमोर सादर करणार असल्योही खताते यांनी आपल्या प्रााारपत्रकातून जाहीर केले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांची मजबूत फळी, नियोजनबद्ध प्रचार आणि सकारात्मक वातावरण यामुळे खेर्डी पंचायत समिती गणात ठाकरे शिवसेनेच्या खताते यांना अनुकूल वारा असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.