महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उमरगा सायकलिस्ट क्लबच्या वतीने उमरगा ते रामेश्वरम सायकल प्रवास

05:33 PM Dec 14, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

उमरगा प्रतिनिधी

Advertisement

उमरगा सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून आणखी एक नवा इतिहास रचला जाणार आहे. सायकलिस्ट क्लबच्या पुढाकाराने परिवारातील ४ सदस्य उमरगा ते रामेश्वरम अशा तब्बल १२५० किलोमीटर अंतराच्या सायकल प्रवासाला निघाले आहेत.या तरुणांनी रात्री रामेश्वर कडे प्रस्थान केले. त्यांचा हा प्रवास अत्यंत धाडसी आहे. त्यांच्या या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी शहरातील व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

Advertisement

उमरगा ते रामेश्वर मोहिमेत सहभागी झालेले हे उमरगा सायकलिस्ट क्लबचे सदस्य असून ते शहरात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात आणि हाफ मॅरेथॉन, सायकल मोहिमेत पुढाकार घेत असतात. त्यांनी मोठ्या धाडसाने१२५० किलोमीटर सायकल प्रवासाची मोहीम हाती घेतली असून,यातून उमरग्याच्या नावे नवा विक्रम नोंदला जाईल. तसेच मुली वाचवा, पाणी वाचवा, झाडे लावा असा संदेश देतानाच नवा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये संजय सरपे, प्रशांत मोरे अनिल सूर्यवंशी व रवी कदेरे उमरगा सायकलिस्ट क्लबच्या सदस्याचा समावेश आहे.

रामेश्वर या सर्वात मोठ्या मोहिमेत दररोज १६० ते १८० किलोमीटर सायकल प्रवास केला जाणार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे सायकल वीरांची हाती घेतलेली मोहीम नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेची सुरुवात झाली.यावेळी टाळ्यांच्या गजरात शहरवासीयांनी तरुणांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, माजी अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, संविधान विचार मंचाचे अध्यक्ष अशोक बनसोडे बालाजी कुडुबले, अशोक पतगे, मनीष सोनी आदींचा समावेश होता

Advertisement
Tags :
clubcycletripcyclistumarga
Next Article