उमरगा तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात
उमरगा | प्रतिनिधी : महादेव पाटील : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उमरगा तहसील कार्यालयाच्या परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार अमित भारती, गजानन परिस्कर यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक तसेच वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. विविध शाळांमधील विद्यार्थीही मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पडावा, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.