For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उमरगा नगरपालिकेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

12:25 PM Sep 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
उमरगा नगरपालिकेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा
Advertisement

उमरगा : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त (17 सप्टेंबर) उमरगा नगरपालिकेत ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

Advertisement

यावेळी नगराध्यक्ष किरण गायकवाड, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे आणि मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीरांना आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाला शहरातील स्वातंत्र्यसैनिक, नगरसेवक, नगरपालिका अधिकारी-कर्मचारी तसेच होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुक्तिसंग्रामाच्या स्मृतींना उजाळा देत हुतात्म्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.