थकीत 21 कोटींच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे उपोषण; उमरगा तहसील कार्यालयासमोर आंदोलन
03:12 PM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
धाराशिव | उमरगा : भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची सुमारे 21 कोटी रुपयांची थकीत रक्कम मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उमरगा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
Advertisement
थकीत ऊस बिलाची रक्कम तातडीने अदा करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. हक्काची रक्कम मिळण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणाची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. थकीत रक्कम अदा करण्याबाबत कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासनाकडून ठोस कार्यवाहीची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Advertisement
Advertisement