For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुष्काळग्रस्तांच्या यादीबाबत व्हायरल माहिती फेक; अफवांवर विश्वास ठेवू नका :आमदार प्रवीण स्वामी

03:18 PM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुष्काळग्रस्तांच्या यादीबाबत व्हायरल माहिती फेक  अफवांवर विश्वास ठेवू नका  आमदार प्रवीण स्वामी
Advertisement

उमरगा, प्रतिनिधी :

Advertisement

उमरगा तालुका दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. मात्र, ही माहिती अधिकृत नसून नागरिकांनी अशा अप्रमाणित पोस्टवर विश्वास ठेवू नये, तसेच संबंधित याद्या पुढे फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन आमदार प्रवीण स्वामी यांनी केले आहे.

याबाबत आमदार स्वामी यांनी यापूर्वीही अनेकदा स्पष्टीकरण दिले असल्याचे सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच नांदेड येथे मराठवाड्यातील दुष्काळाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत कृषिमंत्र्यांकडे याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेली दुष्काळग्रस्तांची यादी अधिकृत नसल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे आमदार स्वामी यांनी सांगितले.

Advertisement

त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित याद्यांवर विश्वास न ठेवता त्या पुढे पाठवू नयेत. अधिकृत माहितीसाठी प्रशासनाच्या सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन आमदार प्रवीण स्वामी यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.