For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुरुंगातच राहणार उमर, 10 जानेवारीला सुनावणी

06:15 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
तुरुंगातच राहणार उमर  10 जानेवारीला सुनावणी
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदच्या जामीन याचिकेवरील सुनावणी 10 जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे. उमर खालिदला दिल्लीतील दंगलीच्या कटात सामील असल्याच्या आरोपासाठी यूएपीए अंतर्गत अटक करण्यात आली होती. उमर खालिदचे वकील कपिल सिब्बल आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू हे उपलब्ध नसल्याने न्यायाधीश बेला त्रिवेदी आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने सुनावणी स्थगित केली. याप्रकरणी युक्तिवाद करण्यासाठी वरिष्ठ अधिवक्ते उपस्थित नाहीत, यामुळे  याचिकाकर्ते आणि भारत सरकारच्या विनंतीवर ही सुनावणी 10 जानेवारीसाठी सूचीबद्ध करण्यात येत असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा यांनी 9 ऑगस्ट रोजी उमर खालिदच्या याचिकेवरील सुनावणीतून अंग काढून घेतले होते. उमर खालिदने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने जामीन याचिका फेटाळली होती. उमर हा अन्य आरोपींच्या सातत्याने संपर्कात होता. आरोपीच्या विरोधात युएपीए अंतर्गत झालेली कारवाई प्रथमदर्शनी योग्य वाटत असल्याचे उच्च न्यायालयाने जामीन याचिका फेटाळत म्हटले होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.