For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उमर खालिदला नाकारला जामीन

06:29 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
उमर खालिदला नाकारला जामीन
Advertisement

दिल्ली दंगलीप्रकरणी आरोपी : न्यायालयाने फेटाळली याचिका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या कडकडूमा न्यायालयाने 2020 च्या दिल्ली दंगलीच्या कट प्रकरणातील आरोपी उमर खालिदची जामीन याचिका मंगळवारी फेटाळली आहे. खालिदवर युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. माझ्याहून गंभीर गुन्हे नोंद असलेले अन्य आरोपी जामिनावर बाहेर असल्याचा दावा उमर खालिदच्या वतीने करण्यात आला होता.

Advertisement

खालिदने सुनावणीस होत असलेल्या विलंबाचे कारण देत नियमित जामिनाची मागणी केली होती. विशेष न्यायाधीश समीर वाजपेयी यांनी 13 मे रोजी त्याच्या जामीन याचिकेवर निर्णय राखून ठेवला होता. दिल्ली पोलिसांनी जामीन याचिकेला विरोध दर्शवत खालिदकडून करण्यात आलेले आरोप आधारहीन असल्याचे म्हटले होते. तर दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात खालिदच्या विरोधात दहशतवादाशी निगडित कुठलाही आरोप नमूद नाही. तसेच त्याच्या नावाचा केवळ दस्तऐवजात उल्लेख असल्याचा युक्तिवाद खालिदचे वकिलाकडून करण्यात आला होता.

खालिद विरोधात मीडिया ट्रायल झाल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला आहे. तर दिल्ली पोलिसांनी उमर खालिद विरोधात 23 ठिकाणी निदर्शनांची योजना आखल्याचा आरोप केला आहे. या निदर्शनांमुळेच शहरात दंगली फैलावल्याचा दावा आहे. फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयातील स्वत:ची याचिका मागे घेतल्यावर खालिदने सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

Advertisement
Tags :

.