उमर खालिद, शरजीलचा जामीन अर्ज फेटाळला
06:31 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : 2020 च्या दिल्ली दंगलींप्रकरणी आरोपी असलेले उमर खालिद आणि शरजील इमाम यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे. न्यायाधीश प्रतिभा सिंह आणि दिनेश भट्ट यांच्या खंडपीठाने कडकडडूमा न्यायालयाच्या 4 जुलै रोजीच्या आदेशाच्या विरोधात दोघांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. सत्र न्यायालयाने त्यांची नियमित जामीन याचिका फेटाळली होती.
Advertisement
Advertisement