उमेद फौंडेशनने ५०० गरिबांसोबत साजरी केली "वंचितांच्या दारी दिवाळी"
वाकरे।प्रतिनिधी
रविवारी सकाळी उमेद फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सांगरूळ फाटा,कोपार्डे (ता. करवीर) येथील माळावर झोपड्या आणि पालात राहणाऱ्या गोरगरीब जनतेसोबत "वंचितांच्या दारी दिवाळी" सामाजिक दिवाळी साजरी करून खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद घेतला. या गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावरील आनंदामुळे सर्वांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.उमेद फौंडेशनच्यावतीने सलग ८ व्या वर्षी कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५०० गरजूंना फराळाचे वाटप करण्यात आले.
सांगरुळ फाटा,कोपार्डे येथे माळावर कचरा वेचक, हेळवी,हंगामी काम करणारी अनेक गोरगरीब कुटुंबे राहतात. उमेद फौंडेशनमार्फत प्रत्येक वर्षी या कुटुंबाना दिवाळी फराळ वाटप करण्यात येते.रविवारी सकाळी उमेद फौंडेशनच्या कार्यकर्त्यांची "वंचितांच्या दारी दिवाळी" साजरी करण्यासाठी लगबग सुरू झाली. कोण झोपड्यांसमोर रांगोळी काढत होते,तर कोणी आकाशकंदील बांधत होते,कोणाची पणत्या पेटवण्याची लगबग सुरू होती,जणू घरातील कार्य असल्याचे समजून सर्वजण धावपळ करीत होते.अखेर सर्व झोपड्यांसमोर रांगोळी काढुन झाल्यावर उपस्थित उमेद कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रत्येक झोपडीतील गरजूंना दिवाळी फराळासह पणती,साबण,तेल ,उटणे भेट देण्यात आले.दिवाळी फराळ मिळाल्यानंतर या वंचितांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
गेले १५ दिवस फराळ किटचे नियोजन सचिन बगाडे, अभय पाटील, राजेंद्र पाटील यांनी केले.फराळ वाटप प्रकाश गाताडे, कुंभी कासारी बँकेचे संचालक प्रा.एस.पी.चौगले, विनायक पाटील, प्रदीप नाळे,प्रकाश म्हेत्तर,विजय पाटील,तातोबा डांगे,मच्छिंद्र मगदूम,विक्रम म्हाळुंगेकर, सागर कासोटे, ज्ञानेश्वर चव्हाण,डॉ. तुकाराम खाडे, संदीप कुंभार,किशोर भोसले,अक्षय तावडे,महेश खाडे, इंद्रजीत खाडे, सनी नाळे, भिमा चाबुक, आदर्श चाबूक, ओंकार सूर्यवंशी,अक्षय पाटील,अजय पाटील,एकनाथ पाटील,आयुष घुंगुरकर व इतरांच्या हस्ते करण्यात आले.