उमा पाटीलने उज्ज्वलाला घातला 4 लाखांचा गंडा
कोलवाळ पोलिसस्थानकात तक्रार दाखल
पणजी : सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या संशयित उमा पाटील (बायणा-वास्को) हिच्या विरोधात आणखी एक गुन्हा कोलवाळ पोलिसांनी नोंद केला आहे. नादोडातील एका महिलेला तिच्या पतीला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून संशयित उमा पाटील हिने 4 लाखांचा गंडा घातला आहे. कोलवाळ पोलासांनी कलम 420 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी उज्वला सिद्धेश परब (नादोडा, बार्देश) यांनी कोलवाळ पोलिसस्थानकात तक्रार दाखल केली आहे. हा फसवणुकीचा प्रकार गेल्या ऑगस्टमध्ये घडला होता. मात्र उमा पाटील या महिलेने उज्ज्वला यांचे आश्वासन पूर्ण केले नाही आणि घेतलेले पैसेही परत केले नाहीत, असे तक्रारीत नमूद केले आहे. वास्को पोलिसांनी उमाला फसवणुकीच्या प्रकरणात अटक केल्याची माहिती मिळताच या तक्रारदार महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित महिलेविऊध्द फसवणकीचा गुन्हा नोंद केला आहे. उपनिरीक्षक प्रकाश घाडी पुढील तपास करीत आहेत सध्या उमा पाटील व तिचा मुलगा दोघेही पोलीस कोठडीत आहेत.