For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्ट्राव्हायोलेटची पुढील वर्षी येणार इलेक्ट्रीक स्कूटर

07:00 AM Sep 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
अल्ट्राव्हायोलेटची पुढील वर्षी येणार इलेक्ट्रीक स्कूटर
Advertisement

कर्नाटकात दुचाकीचे उत्पादन सुरु : 10 हजार मासिक उत्पादनाचे ध्येय

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अल्ट्रावायोलेट ऑटोमोटीव्ह कंपनीची इलेक्ट्रीक दुचाकी पुढील वर्षी बाजारात उतरवली जाणार असल्याची माहिती आहे. बेंगळूरातील या कंपनीच्या या गाडीचे उत्पादन होसूरच्या कारखान्यात केले जात असून मासिक 10 हजार गाड्यांचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले जात आहे. होसूरात नव्याने कारखाना उभारण्यात येणार आहे. त्याचे काम लवकरच सुरु होणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. नव्या गाडीचे नाव टेसरॅक्ट असे ठेवण्यात आले आहे. कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नारायण सुब्रमण्यम म्हणाले की, कंपनी पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत आपल्या टेसरॅक्ट या इलेक्ट्रीक स्कूटरला बाजारात उतरवेल. या गाडीचे उत्पादन मासिक 10 हजारवर नेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. जेव्हा कंपनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय करु लागेल तेव्हा एकूण वाहन संख्येत स्कूटर व मोटरसायकल यांची हिस्सेदारी 50-50 टक्के इतकी राहण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली.

Advertisement

होसूरमध्ये नवा कारखाना

कंपनी होसूरमध्ये नवा उत्पादन कारखाना सुरु करणार असून तेथे स्कूटरचे उत्पादन घेतले जाईल. पुढील 6 ते 8 महिन्यात कारखाना सुरु होऊ शकतो. पुढील 5 वर्षात कंपनी 779 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना बनवत आहे. नंतरच्या कालावधीत वार्षिक 2.5 लाख वाहनांचे उत्पादन घेण्यासोबतच नंतर त्यात वाढ करुन 5 लाख वाहनांचे उत्पादन वार्षिक तत्वावर घेण्याची योजना आखण्यात आल्याचे सीईओ नारायण यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.