For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अल्ट्राटेक’चा नफा 27 टक्क्यांनी वाढला

06:33 AM Jan 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘अल्ट्राटेक’चा नफा 27 टक्क्यांनी वाढला
Advertisement

तिमाही नफा 1,729 कोटींवर : महसूल 21,830 कोटी रुपयांवर 

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठी सिमेंट उत्पादक कंपनी अल्ट्राटेक सिमेंटने शनिवारी वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे (ऑक्टोबर-डिसेंबर) निकाल जाहीर केले. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वर्षानुवर्षे 26.8 टक्क्यांनी वाढून 1,729.44 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 1,363.44 कोटी रुपये नफा झाला होता.

Advertisement

सिमेंटच्या विक्रमी विक्री आणि सुधारित कामकाजामुळे कंपनीच्या कामगिरीत ही वाढ दिसून आली आहे. महसूल 23 टक्क्यांनी वाढला, विक्री 38.87 दशलक्ष टनांवर पोहोचली आदित्य बिर्ला ग्रुपच्या प्रमुख कंपनीचा ऑपरेशन्समधून मिळणारा महसूलही 22.8 टक्क्यांनी वाढून 21,829.68 कोटी रुपये झाला. मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत हा आकडा 17,778.83 कोटी रुपये होता. वॉल्यूमच्या बाबतीत, कंपनीने या तिमाहीत एकूण 38.87 दशलक्ष टन (एमटी) सिमेंट विकले आहे, जे गेल्या वर्षीपेक्षा 15 टक्के जास्त आहे. देशांतर्गत बाजारपेठेत ग्रे सिमेंटची मागणी 15.4 टक्के वाढली आहे.

अल्ट्राटेक जगात दुसऱ्या क्रमांकावर

अल्ट्राटेकने या तिमाहीत महाराष्ट्रातील धुळे आणि राजस्थानमधील नाथद्वारा येथे नवीन प्लांट सुरू केले आहेत. आता कंपनीची एकूण देशांतर्गत क्षमता 188.66 दशलक्ष टन प्रतिवर्ष (एमटीपीए) पर्यंत वाढली आहे. जर युएईमधील कामकाजाचाही समावेश केला तर कंपनीची जागतिक उत्पादन क्षमता 194.06 एमटीपीए पर्यंत वाढली आहे. यासह, उत्पादन क्षमतेच्या बाबतीत आणि विक्रीच्या बाबतीत (चीन वगळता) अल्ट्राटेक जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सिमेंट कंपनी बनली आहे.

Advertisement
Tags :

.