अल्ट्राटेक सिमेंट 10 हजार कोटीची करणार गुंतवणूक
मुंबई :
भारतातील मोठी सिमेंट उत्पादक कंपनी अल्ट्राटेक सिमेंट येत्या काळात उत्पादन वाढीसंदर्भात उपक्रम हाती घेणार आहे. या करीता कंपनी 10,255 कोटी रूपये गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळते आहे. या योगे कंपनी सिमेंट उत्पादन क्षमता वाढीसोबत एकंदर 22.8 दशलक्ष टन प्रतिवर्ष इतकी करणार आहे.
इंडिया सिमेंटवर कब्जा
अलीकडेच झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये गुंतवणूकीच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. अल्ट्राटेक सिमेंट ही आदित्य बिर्ला समुहातील सहकारी कंपनी आहे. अलीकडेच अल्ट्राटेकने दक्षिण भारतातील इंडिया सिमेंट या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. त्याचवेळी कंपनीने 440 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचे घोषित केले होते. त्या ठिकाणी उत्पादन क्षमता 2.80 दक्षलश टन इतकी वाढीव केली जाणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
वार्षिक 200 दशलक्ष टनचे उद्दिष्ट
भारतातील सिमेंटची मागणी पूर्ण करताना शाश्वत विकासावर कंपनीचा भर असणार आहे. सध्याला पाहता कंपनी वर्षाला 192.26 दशलक्ष टन इतक्या सिमेंटचे उत्पादन घेते. अलीकडच्याच काळात कंपनीने यावर्षाअखेर कंपनीचे सिमेंट उत्पादन उद्दिष्ट 200 दशलक्ष टन वार्षिक इतके साध्य करण्याचे ठरविले होते.
महत्त्वाचे मुद्दे
? एकूण उत्पादन 22.8 दशलक्ष टनवर नेणार
? क्षमता वाढीसाठी करणार गुंतवणूक
? सध्याला 192 दशलक्ष टन वार्षिक उत्पादन